भाजपचा एक सदस्यीय प्रभाग पद्धतीला विरोध, मग कोणती पद्धत हवी?; गिरीश बापटांनी केलं मोठं विधान

निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीसाठी एक सदस्यी प्रभाग पद्धती जाहीर केली आहे. भाजप खासदार गिरीश बापट यांनी या पद्धतीला विरोध केला आहे. (girish bapat)

भाजपचा एक सदस्यीय प्रभाग पद्धतीला विरोध, मग कोणती पद्धत हवी?; गिरीश बापटांनी केलं मोठं विधान
girish bapat
Follow us
| Updated on: Aug 26, 2021 | 1:41 PM

पुणे: निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीसाठी एक सदस्यी प्रभाग पद्धती जाहीर केली आहे. भाजप खासदार गिरीश बापट यांनी या पद्धतीला विरोध केला आहे. आम्हाला चार सदस्यीय प्रभाग पद्धती हवी आहे, असं गिरीश बापट यांनी म्हटलं आहे. (bjp oppose one member ward structure in maharashtra)

भाजप नेते, खासदार गिरीश बापट यांनी टीव्ही9 मराठीशी बोलताना एक सदस्यीय प्रभाग पद्धतीला विरोध असल्याचं सांगितलं. आम्हाला चार सदस्यीय प्रभाग पद्धती हवी आहे. त्यामुळे एक सदस्यीय प्रभाग पद्धतीला आमचा विरोध आहे. हा सगळा राज्य सरकारचा निर्णय आहे, कॅबिनेट काय निर्णय घेते ते बघू, असं बापट यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर राजकीय संघर्ष निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

2011 च्या जणगणनेनुसार ठरणार प्रभाग

निवडणूक आयोगाने पुणे आणि पिंपरी चिंचवडसह राज्यातल्या 18 महानगरपालिकांमध्ये एक प्रभाग एक सदस्य पद्धतीनुसार निवडणूक होईल असं स्पष्ट केलं आहे. 2021 ची जनगणना झाली नसल्याने 2011 च्या जनगणनेनुसारच ही प्रभाग रचना केली जाणार आहे. एका प्रभागात सरासरी 21 हजार 423 मतदार असणार आहेत. आयोगाच्या निकषानुसार किमान मतदारांची संख्या ही सरासरीच्या 10 टक्के कमी आणि कमाल मतदारांची संख्या सरासरीच्या 10 टक्के जास्त असू शकतात. त्यानुसार एका प्रभागात कमीत कमी 19 हजार 221 मतदार तर जास्तीत जास्त 23 हजार 565 मतदार असू शकतात.

अशी ठरणार प्रभागरचना

प्रभाग रचनेनुसार प्रभागाची सीमा ठरवताना काही सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसारच प्रभाग रचना केली जाणार आहे. यामध्ये मोठे रस्ते, गल्ल्या, नद्या, नाले, डोंगर, रस्ते उड्डाणपूल या यांच्या नैसर्गिक मर्यादा लक्षात घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यासोबतच एका इमारतीचे किंवा एका घराचे, एका चाळीचे दोन प्रभागात विभाजन होणार नाही याची काळजी घ्या असं सांगण्यात आलं आहे. मोकळ्या जागांसह सर्व सार्वजनिक जागा या कोणत्या ना कोणत्या प्रभागात यायला हव्यात. शिवाय प्रभाग रचना करताना रस्ते, नद्या, नाले, सिटी सर्व्हे यांच्या नंबरला उल्लेख करणं गरजेचं आहे.

फेब्रुवारी 2022 मध्ये महापालिका निवडणुका?

राज्यात फेब्रुवारी 2022 मध्ये महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयोगाकडे काही महिन्यांचाच अवधी शिल्लक आहे. अशा परिस्थितीत मुदतीत निवडणुका घेण्यासाठी उद्यापासूनच प्रभाग रचनेचं काम हाती घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यासाठी महापालिकांच्या हद्दीत नव्याने समाविष्ठ करण्यात आलेल्या किंवा वगळण्यात आलेल्या क्षेत्रांचा विचार करून प्रभाग आखण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला करण्यात आल्या आहेत. यासोबतच प्रभाग रचना, त्यावरच्या हरकती-सूचना, आरक्षण सोडत ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. (bjp oppose one member ward structure in maharashtra)

संबंधित बातम्या:

पुणे, पिंपरी चिंचवडसाठी आता ‘एक प्रभाग एक नगरसेवक पद्धत’, महापालिकेत राजकीय समीकरणं बदलणार?

जातीनिहाय जनगणनेसाठी बिहारमधील सत्ताधारी एकवटले; रोहित पवार म्हणाले..

भाजप आमदार राहुल कुल यांना धक्का, साखर कारखान्याला जप्तीची नोटीस

(bjp oppose one member ward structure in maharashtra)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.