AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनात मांडे खाऊ नका, गोव्यात सत्ता तर आमचीच येणार; चंद्रकांत पाटलांचा राऊतांना टोला

गोव्याच्या बाबत कोणीही मनातल्या मनात मांडे खाऊ नये. गोव्यात भाजपचीच सत्ता येणार आहे, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांना लगावतानाच गोव्यात भाजप 22 जागांवर विजयी होईल, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.

मनात मांडे खाऊ नका, गोव्यात सत्ता तर आमचीच येणार; चंद्रकांत पाटलांचा राऊतांना टोला
bjp will come back in rule in goa says chandrakant patil
| Edited By: | Updated on: Jan 26, 2022 | 12:14 PM
Share

पुणे: गोव्याच्या बाबत कोणीही मनातल्या मनात मांडे खाऊ नये. गोव्यात भाजपचीच सत्ता येणार आहे, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत ( sanjay raut) यांना लगावतानाच गोव्यात भाजप 22 जागांवर विजयी होईल, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil)  यांनी केला. निवडणुकीत प्रत्येकाला उभं राहायचं असतं. त्यासाठी प्रत्येकजण तिकीटाची मागणी करतो. पण सर्वांनाच तिकीट देणं शक्य नसतं. त्यामुळे तिकीट न मिळाल्याने थोडी बहुत अस्वस्थता असते. मात्र गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (cm pramod sawant) यांनी चांगली कामं केली आहेत. त्यांच्या कामावर जनता खूष आहे. आम्ही भाजपलाच मतदान करून पुन्हा सत्तेत बसवणार असं तिथली जनताच म्हणत आहे. त्यामुळे कुणीही मनातल्या मनात मांडे खाऊ नयेत, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचंही अभिनंदन केलं. मी मुख्यमंत्र्यांवर बोलत होतो. तेव्हा त्यांची तब्येत बरी व्हावी म्हणून प्रार्थना करत होतो. मात्र, ते आजारी असेपर्यंत मुख्यमंत्रीपद रिकामं ठेवू नये किंवा घरातच कुणाला तरी पद द्यावं असं मी म्हटलं होतं, असं पाटील म्हणाले.

टिपू सुलतान यांच्या नावाला विरोध करू

मुंबईतील एका उद्यानाला टिपू सुलतान यांचं नाव देण्यात आल्याने वाद रंगला आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. टिपू सूलतान या नावाला आमचा विरोध आहे. आम्ही याला विरोध करू किंवा आंदोलन करू हा प्रयत्न हाणून पाडू, असा इशाराही त्यांनी दिला.

आमदार निलंबन घटनाबाह्य

12 आमदारांच्या निलंबनावरूनही त्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं. राज्य सरकारने 12 आमदारांचं निलंबन करून संविधानाच्या गाभ्यालाच हात घातला आहे. हे मी सांगत नाहीये. सर्वोच्च न्यायालयानेच हे म्हटलं आहे. कोणत्याही आमदाराचं दोन महिन्यापेक्षा अधिक काळ निलंबन करता येत नाही. पण तरीही या सरकारने आमच्या आमदारांचं निलंबन केलं. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पद्धत बदलली. घटनेत गुप्त पद्धतीने मतदान करण्यास सांगितलेलं असताना ही पद्धत बदलली. हे घटनाबाह्य आहे, असं ते म्हणाले.

ओबीसींचा डेटा कुणाकडेच नाही

यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणावरून सरकारवर हल्लाबोल केला. डोळं मिटून, कान बंद करून बसायचं त्याचं उदाहरण म्हणजे राज्य सरकार आहे. राज्यात राजकीय आरक्षणासाठी राजकीय मागासलेपणाचा डेटा कोणाकडेही नाही. मागास आयोगाकडे आणि कोणाकडेच ओबीसींच्या मागासलेपणाचा डेटा नाही. राजकीय मागासलेपण कधी काढावं लागलं नाही. देवेंद्र फडणवीस हुशार मुख्यमंत्री होते. मराठा आरक्षण देताना देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण देताना सांगितलं की मला नोकऱ्यातलं, शिक्षणातलं, आरक्षण मागा, राजकीय नाही. या देशात राज्यात कधी राजकिय मागासलेपणाचा डेटा गोळा केला गेला नाही. आता म्हणतायेत, पैसै देतो. आता कसले पैसे देतायेत. मंत्रिमंडळाची बैठक हा सगळा दिखावा चाललाय, असा हल्लाही त्यांनी चढवला. 8 तारखेला राज्याचं मागासवर्गीय आयोग सांगणार आहे. आम्ही कोणता डेटा देणार आहोत, असंही ते म्हणाले.

अजितदादा अज्ञान प्रगट करताहेत

सर्वसामान्य माणसांना जीएसटी अशा गोष्टी माहिती नसतात. खोटं बोल पण रेटून बोल अशी अवस्था या सरकारची आहे. जीएसटी कौन्सिल पैसै देणार होतं. सरकार नाहीत, असं सांगतानाच अजित पवार हे अज्ञान प्रगट करत आहेत, असं प्रत्युत्तरही त्यांनी दिलं.

संबंधित बातम्या:

21 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी गुजरातमध्ये भूकंप झाला होता, ज्यात हजारो ठार झाले! 26 जानेवारीच्या नोंदी

Maharashtra News Live Update : जळगावात संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी केले भीक मांगो आंदोलन

Nashik Trees | नाशिकमधल्या ‘त्या’ 200 वर्षे जुन्या वटवृक्षाला आदित्य ठाकरे देणार भेट; पर्यावरणप्रेमींच्या आंदोलनाला बळ!

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.