Boulders fall : पुणे-पानशेत मार्गावर कोसळली दरड, रस्त्यावर दगडांचा खच; 30 गावांचा संपर्क तुटला

अवैध बांधकामांचा हा फटका असल्याचे बोलले जात आहे. यामुळे रस्त्यावर दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. रस्त्यावर दरड पडल्याने वाहतुकीलाही मोठा अडथळा निर्माण होताना दिसून येत आहे.

Boulders fall : पुणे-पानशेत मार्गावर कोसळली दरड, रस्त्यावर दगडांचा खच; 30 गावांचा संपर्क तुटला
पुणे-पानशेत मार्गावर दरड कोसळल्यानं रस्त्यावर आलेले दगडImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 16, 2022 | 3:33 PM

पुणे : पुणे-पानशेत रस्त्यावर दरड कोसळली (Boulders fall) आहे. त्यामुळे याठिकाणची वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे एकूण 30 गावांचा संपर्क तुटला आहे. डोंगर उतारावरील संरक्षक भिंत कोसळून दगडं रस्त्यावर आली आहेत. संरक्षक भिंत आणि दरड कोसळल्यामुळे त्याचा फटका वाहतुकीला (Traffic) बसला आहे. ओसाडे आणि सोनपूर या गावांच्या सीमेवरील डोंगर उतारावर ही दरड कोसळली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (Public Works Departments) सध्या दरड हटविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. घाट रस्त्याच्या परिसरात दरडींचा धोका अधिक दिसून येत आहे. नागरिकांनी अशा ठिकाणांहून प्रवास करणे टाळावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

अवैध बांधकामांचा फटका

अवैध बांधकामांचा हा फटका असल्याचे बोलले जात आहे. यामुळे रस्त्यावर दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. रस्त्यावर दरड पडल्याने वाहतुकीलाही मोठा अडथळा निर्माण होताना दिसून येत आहे. जिल्ह्यात मागील आठ-दहा दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. तिकडे भोर तालुक्यातील घाटमाथ्यावर गेल्या आठवडा भरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाचे प्रमाण अधिक असल्याने दरडी कोसळण्याच्या, रस्ता खचण्याच्या घटना घडत आहेत. अनेक ठिकाणी शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. अजूनही पावसाचा जोर कायम असल्याने प्रशासनाकडून अलर्ट देण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

दरडींचा धोका वाढला

माळशेज घाट परिसरात पावसाची संततधार असल्याने न्याहडी पुलाच्या बाजूला काल दरड कोसळली होती. कल्याण-नगर महामार्ग त्यामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. गेल्या आठवडाभरापासून माळशेज घाट परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. यातच दरडी कोसळत असून प्रशासनाकडून या दरडी हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. वंरध घाटही अत्यंत धोकादायक झाला असून मोठमोठे दगड रस्त्यावर येत आहेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.