Pune Crime | पुण्यात 15 वाहने जाळून राख ; जाणीव पूर्वक आग लावल्याचा नागरिकांचा संशय
गाड्यांना पेटवल्यानंतर आगीचा आवाज व वास आल्याने इमारतीतील नागरिकांनी खाली धाव घेतली. खाली येईपर्यंत सर्व वाहने एकाचवेळी पेटलेली होती. त्यामुळे कोणीतरी जाणीवपूर्वक ही आग लावली असावी, असा संशय नागरिकांनी व्यक्त केला.
पुणे – शहारातील शिवणे परिसरातील शिवकमल प्रेस्टीज या इमारतीच्या पार्किंगमध्ये ( parking )लावलेल्या 13 दुचाकी आणि 2 रिक्षाला आग (vehicles Burn)लावल्याची घटना घडली . पहाटे 5 वाजता घडली. कोणीतरी जाणीवपूर्वक आग लावून वाहने जाळल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे. अग्नीशामक दलाला(Fire brigade) घटनेची मिळताच तातडीने घटना स्थळावर दाखल होत आग आटोक्यात आणली. परंतु तोपर्यंत वाहने जळून खाक झाली.
आगीत वाहने जाळून राखपण विद्युत मीटर व्यवस्थित
अनेकदा पार्किंगमध्ये शॉट सर्किटमुळे आग लागल्याच्या अनेक घटना घडतात. मात्र या घटनेत इमारतीतील विद्युत मीटरचे बॉक्सना आगीची झळ पोहचली नाही. त्यामुळे तेथून आग लागली नाही. ज्या वाहनाला पहिली आग लागली. त्याच्यावर पार्किंगमधील ट्युबलाईट जळाली आहे. त्यामुळे कुणीतरी जाणीवपूर्वक आग लावली असण्याच शक्यता असल्याची माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी उमराटकर यांनी दिली आहे.
अशी झाली घटना उघड गाड्यांना पेटवल्यानंतर आगीचा आवाज व वास आल्याने इमारतीतील नागरिकांनी खाली धाव घेतली. खाली येईपर्यंत सर्व वाहने एकाचवेळी पेटलेली होती. त्यामुळे कोणीतरी जाणीवपूर्वक ही आग लावली असावी, असा संशय नागरिकांनी व्यक्त केला. अग्निशामक दलाच्या जवानांनी आग विझविली. मात्र, तोपर्यंत 13दुचाकी व 2 रिक्षा जळून खाक झाल्या होत्या. या घटनेत कोणत्याही प्रकारची जवीत झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी अशाच प्रकारे दुचाकी जाळल्याची घटना शहात घडली होती. यामध्ये माथेफिरूने जाणीवपूर्वकी दुचाकी जाळलया होत्या.
Vastu| अशा प्रकारे तुमच्या घरात मंदिर तयार करा, घरात सकारात्मक ऊर्जा येईल
आम्ही काँग्रेसकडे झोळी घेऊन उभे नाही, ते कधीही न जिंकलेल्या 10 जागा मागितल्या होत्या : संजय राऊत