पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, चार प्रवाशांचा मृत्यू

बसचे टायर फुटल्याने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या कंटेनरवर बस आदळली. या अपघातात बसची एक बाजू चक्काचूर झाली.

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, चार प्रवाशांचा मृत्यू
अपघात
Follow us
| Updated on: Feb 24, 2023 | 11:49 AM

पुणे : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर (Pune Solapur Expressway) बुधवारी सकाळी भीषण अपघात (Accident)झाला. बस आणि ट्रकच्या झालेल्या या अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू झाला. तसेच २० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. मृत झालेले चौघे जण बसमधील प्रवाशी होते. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. पोलीस कर्मचारी नितीन दिलीप शिंदे (वय ३६) अमर मानतेश कलशेट्टी (वय २०), गणपत मलप्पा पाटील (वय ५५), आरती बिराजदार (वय २५) अशी मृत्यू पावलेल्यांची नावे आहेत.

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्याच्या हद्दीत चौफुलावर अपघात झाला. सोलापूरहून पुण्याकडे ही लक्झरी बस निघली होती. या बसचे टायर फुटल्याने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या कंटेनरवर बस आदळली. या अपघातात बसची एक बाजू चक्काचूर झाली. या अपघातात दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर उपचारादरम्यान आणखी दोन जणांचे निधन झाले. या अपघातातील जखमींना केडगाव येथील दवाखान्यात तर काही गंभीर जखमींना पुण्याला हलवण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

कसा झाला अपघात

सोलापूरहून खासगी ट्रॅव्हलची बस पुण्याकडे येत होती. पहाटे सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास सर्व प्रवासी झोपेत होते. यावेळी माणगावजवळ बसचे टायर फुटले. त्यानंतर बस रस्त्याच्या कडेला थांबलेल्या एक ट्रकवर जाऊन आदळली. त्यात बसची एक बाजू पूर्णपणे फाटली आहे. अपघातात चालकही जखमी झाला आहे.

मृतांची संख्या वाढण्याची भीती

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. यावेळी स्थानिक नागरिकांनी मदत केली. अपघातात २० जण जखमी झाले आहेत. त्यातील काही जणांची प्रकृती गंभीर आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.