तरुणीची छेड काढली, भावाला मारहाण केली, मग तिने उचलले असे पाऊल की…
Pune Cirme News : पुणे जिल्ह्यात तरुणीची छेड काढल्याचा प्रकार घडला. तसेच त्या तरुणीच्या भावासही मारहाण करण्यात आली. या प्रकारानंतर दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुणे जिल्ह्यातील भोरमध्ये हा प्रकार घडला.
विनय जगताप, भोर, पुणे : पुण्याच्या भोरमध्ये तरुणीची झेडछाड करून तरुणीच्या भावाला मारहाण केल्याचा प्रकार घडला. आरोपी घरामध्ये घुसून गैरवर्तन करत होते. विरोध केल्यावर मारहाण करीत होते. या प्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. 31 मे ते 17 जून या कालावधीत भोर परिसरात हा प्रकार घडला. मुख्य आरोपी अक्षय शिंदे आणि त्याच्या इतर नऊ सहकाऱ्यांविरोधात भोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू करण्यात आला आहे.
काय आहे प्रकार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अक्षय शिंदे हा 31 मे रोजी सायंकाळी तरुणीच्या घरात जबरदस्तीने घुसला. त्याने त्या तरुणीशी गैरवर्तन केले. त्यावेळी तिने प्रतिकार केला असता आरोपीने तिला मारहाण करून शिवीगाळ करत दमदाटी केली. त्यानंतर 05 जून ते 08 रोजी दरम्यान तरुणी कॉलेजला जात असताना अक्षय याने तिचा मोटार सायकलवरून पाठलाग केला.
मग उचलले असे पाऊल
अक्षयकडून सतत दिल्या जाणाऱ्या त्रासामुळे तरुणीने 17 जून रोजी फिनाईलचे प्राशन केले. त्यानंतर तिला त्रास होऊ लागल्याने शेजारच्या महिलेने तिला खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्या तरुणीला तिचा भाऊ ओंकार आवाळे रुग्णालयातून घरी घेऊन येत होता. त्यावेळी दहा आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून त्यास मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. उपअधीक्षक रेखा रामभाऊ वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली भोर पोलिस स्टेशनचे कर्मचारी पुढील तपास करीत आहेत.
यांच्यावर केला गुन्हा दाखल
झेडछाडीला कंटाळून तरुणीचा फिनाईल प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केलाय. त्यानंतर मुख्यआरोपी अक्षय शिंदे आणि त्याच्या इतर नऊ सहकाऱ्यांच्या विरोधात भोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. अक्षय शिंदे, रोहित शिंदे, बाबू शिंदे, प्रतीक दुधाळ, (सर्व राहणार वेनवडी, तालुका भोर, जिल्हा पुणे), सोन्या बांदल, मयूर साळेकर, (रा. विंग, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा, संकेत शिर्के, (रा. भोलावडे, तालुका भोर, जिल्हा पुणे ) समीर जाधव, आदिल जमादार, (रा. भोर जिल्हा पुणे), चिक्या शिवतरे, (रा. उत्रौली, तालुका भोर जिल्हा पुणे) यांच्यांवर भोर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा
पुण्यातून आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या MPSC उत्तीर्ण विद्यार्थीनीचा गुढ मृत्यू