धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयांबाहेर आंदोलन, चंद्रकांत पाटलांचा इशारा
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपकडून आता जोर धरु लागली आहे (Chandrakant Patil demand Minister Dhananjay Munde resignation)
पुणे : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपकडून आता जोर धरु लागली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज (16 जानेवारी) पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला नाही तर राज्यभर आंदोलन करु, असा इशारा त्यांनी दिला (Chandrakant Patil demand Minister Dhananjay Munde resignation).
“धनंजय मुंडे यांचा कबुलीजबाब गंभीर आहे. याच कबुलीजबाबावरुन धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वत: आरोप गंभीर असून आरोपांची दखल घेतली जाईल, असं म्हणाले होते. शरद पवार अशा प्रकारच्या प्रकरणात कडक धोरण स्वीकारतात. त्यांच्या 50 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी कुणालाच पाठिशी घातलं नाही. मात्र, काल त्यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यावरुन महाराष्ट्राचा भ्रमनिरास झाला”, अशी भूमिका त्यांनी मांडली.
“शरद पवारांकडून नैतिकतेची चाड अपेक्षित आहे. भारतीय राजकारणात अशा घटना घडल्यानंतर राजीनामा देण्याची कृती झालेली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा. राजीनामा दिला नाही म्हणून भाजप महिला मोर्चा सोमवारपासून (18 जानेवारी) जिल्ह्याधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करणार. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाने जिल्ह्याधिकाऱ्यांकडे निवेदन देणार”, असा इशारा त्यांनी दिला.
“विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात दुफळी नाही. दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. त्यासाठी तुम्ही कधीच यशस्वी होणार नाहीत. आमचं रेणू शर्मा या विषयावर एकमत आहे”, असंदेखील ते म्हणाले.
“उद्ववजी प्रबोधनकारांचे नातू आणि बाळासाहेबांचे चिरंजीव आहेत. ते राजीनामा का घेत नाहीत हे कळत नाही. रेणू शर्मा विषयी चौकशी करा, पण करुणाबद्दलही बोला, फक्त दिशाभूल सुरू आहे”, असा आरोप त्यांनी केला.
पाहा आखाडा, दररोज दु. 4 वा टीव्ही 9 मराठीवर
“शरद पवारांनी घुमजाव का केला हे माहीत नाही. ते कळलंही नाही. मुंडेंनी कबुली दिली हा त्यांचा चांगूलपणा आहे. पण कबुली दिली म्हणजे जी चूक आहे ती चूक नाही असं म्हणता येत नाही”, असं मत त्यांनी मांडलं (Chandrakant Patil demand Minister Dhananjay Munde resignation).
संबंधित बातमी :
शरद पवारांनी नैतिकता पाळावी, चौकशी होईपर्यंत मुंडेंचा राजीनामा घ्यावा; चंद्रकांतदादा मागणीवर ठाम