Video : इथं सगळं झाकाझाकीचं काम चाललेलं आहे.. जेव्हा वानवडी पोलीस ठाण्याच्या पीआयला चित्रा वाघांनी सर्वांसमोर झापलं !
भाजप नेत्या चित्रा वाघ पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी प्रचंड आक्रमक झाल्या आहेत (Chitra Wagh angry on pune wanawadi police PI)
पुणे : “पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी तिच्या आई-वडिलांनी तक्रार केली नसेल. पण ऑडिओ क्लिपचं काय झालं ते सांगणार आहात का? इथे सगळी झाकाझाकीचे कामं सुरु आहेत”, अशा शब्दात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी वानवडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक लगड यांना झापलं. यावेळी लगड यांच्यासह दोन पोलीस कर्मचारीदेखील तिथे उपस्थित होते. याशिवाय प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधीदेखील उपस्थित होते (Chitra Wagh angry on pune wanawadi police PI).
नेमकं काय घडलं?
भाजप नेत्या चित्रा वाघ पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी प्रचंड आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी आज (25 फेब्रुवारी) पूजा चव्हाणचा मृत्यू झालेल्या वानवडी परिसरातील इमारतीला भेट देत पाहणी केली. त्यानंतर त्यांनी वानवडी पोलीस ठाण्याला भेट दिली. यावेळी चित्रा वाघ आणि वानवडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. यावेळी चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण प्रकरणी अद्याप गुन्हा का दाखल केला नाही? असा प्रश्न विचारला (Chitra Wagh angry on pune wanawadi police PI).
चित्रा वाघ पोलीस निरीक्षकांना काय म्हणाल्या?
“तुम्ही देखील या प्रकरणात सहभागी आहात. तुमच्याकडेही सूमोटोचा अधिकार असतानाही तुम्ही एफआयआर दाखल केलेला नाही. आणि हे तुम्हाला जड पडणार आहे. तमचे दोन ऑफिसरही समोर आहेत. तुम्ही सगळी मनमानी चालवली आहे. तुम्हाला सुमोटोचा अधिकार नाही? किती लोकांना फसवणार तुम्ही आता?”, असे सवाल चित्रा वाघ यांनी केले.
‘लगडला चालवणारा बाप कोण आहे, हे भाजप नक्की शोधून काढेल’
वानवडी पोलीस ठाण्याला भेट दिल्यानंतर चित्रा वाघ यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्यावर सडकून टीका केली. “आम्ही इतक्या दिवसांपासून मुंबईतून पूजा चव्हाण प्रकरणावर लक्ष ठेवून आहोत. मात्र, आज प्रत्यक्ष घटनास्थळी आल्यानंतर तपासाची परिस्थिती गंभीर असल्याचे दिसून आले. वानवडी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक लगट यांना हे प्रकरण रफादफा करण्यासाठीच बसवले आहे. मी त्यांना प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी अत्यंत मग्रुरीने उत्तरे दिली. आपला कोणीतरी बाप वरती बसलाय, कोणी काही बोलले नाही तरी तू काही करायचे नाही, आम्ही काय ते बघतो, अशा एकंदर आविर्भावात PI लगड दिसतात. या लगडला चालवणारा बाप कोण आहे, हे भाजप नक्की शोधून काढेल”, असे चित्रा वाघ यांनी म्हटले.
चित्रा वाघ नेमकं काय म्हणाल्या, बघा व्हिडीओत
संबंधित बातम्या:
भाजपने आधीच सुधीर मुनगंटीवारांकडे सर्व जबाबदारी दिली असती तर…? उदय सामंतांचं मोठं विधान