पुण्यात कोरोनाचा हाहा:कार, रुग्णालये अपुरी; रुग्णांना ठेवण्यासाठी हॉटेल्स घेतल्या भाड्याने

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रचंड संसर्ग वाढला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात तर कोरोनाचा स्फोटच झाला आहे. पुण्यात कोरोनाचा संसर्ग अधिक वाढला असून रुग्णालयेही भरून गेली आहेत. (coronavirus cases rising again in pune)

पुण्यात कोरोनाचा हाहा:कार, रुग्णालये अपुरी; रुग्णांना ठेवण्यासाठी हॉटेल्स घेतल्या भाड्याने
प्रातिनिधिक चित्रं
Follow us
| Updated on: Apr 07, 2021 | 12:34 PM

पुणे: महाराष्ट्रात कोरोनाचा प्रचंड संसर्ग वाढला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात तर कोरोनाचा स्फोटच झाला आहे. पुण्यात कोरोनाचा संसर्ग अधिक वाढला असून रुग्णालयेही भरून गेली आहेत. त्यामुळे रुग्णांना ठेवण्यासाठी हॉटेल्स भाड्याने घेतली जात आहेत. कोरोनाचा संसर्ग प्रचंड वाढत असल्याने पुणेकरांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (coronavirus cases rising again in pune)

पुण्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने जिल्ह्यात बेड्स कमी पडत आहेत. पुण्यात गेल्या 15 दिवसात दररोज चार हजार रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे रुग्णांना ठेवण्यासाठीच्या बेड्सची संख्या कमी झाली आहे. पुण्याच्या रुबी रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे बेडची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे रुग्णालयाने तीन हॉटेल्स भाड्याने घेतल्या असून या ठिकाणी 180 बेड्स उलब्ध करून देण्यात आल्या आहेत. रुबी रुग्णालयाशिवाय पुण्याच्या सरकारी रुग्णालय आणि इतर रुग्णालयात बेडसची झपाट्याने कमतरता जाणवत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

पुण्यात सध्या किती रुग्ण?

पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही 2 लाख 83 जार 819 रुग्ण इतकी आहे. यापैकी 2 लाख 38 हजार 890 रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात सध्या 39 हजार 518 सक्रिय रुग्ण आहेत. पुण्यात आतापर्यंत 5 हजार 411 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुण्याचा मृत्यूदर हा 1.86 टक्के इतका आहे. शहरासह जिल्ह्याची परिस्थिती दिवसेंदिवस भयावह होत आहे.. त्यामुळे आता लसीकरण आणि कडक निर्बंध हाच त्यावर उपाय आहे.

मुंबईत बेडस पुरेशा, पण संख्या वाढतेय

मुंबईत दिवसाला सरासरी दहा हजार रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. पालिकेच्या माहितीनुसार मुंबईत पुरेशा प्रमाणात बेड्स आहेत. परंतु कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असल्याने आरोग्य विभागाची चिंता व्यक्त केली जात आहे. मुंबईत सध्या 5400 बेड्स रिकाम्या आहेत. 5 एप्रिलपर्यंतचा हा आकडा आहे. मुंबईत सुमारे 17 हजार बेड्स फुल्ल झाल्या आहेत. तर 136 आयसीयू बेड्स रिकाम्या असून 51 व्हेंटिलेटर बेड्सही रिकाम्या आहेत. (coronavirus cases rising again in pune)

पुण्यात सध्या बेड्सची स्थिती

>> ऑक्सिजन बेड्स – 4517

>> ऑक्सिजन विरहीत बेड्स – 2314

>> आयसीयू बेड्स – 424

>> व्हेंटिलेटर्स बेड – 515

>> एकूण – 7770

शिल्लक बेडची स्थिती

>> ऑक्सिजन बेड्स – 418

>> ऑक्सिजन विरहीत बेड्स – 695

>> आयसीयू बेड्स – 12

>> व्हेंटिलेटर्स बेड – 12

>> एकूण – 1137 (coronavirus cases rising again in pune)

संबंधित बातम्या:

दररोज 10 हजारांपेक्षा जास्त रुग्ण, पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा सविस्तर रिपोर्ट

Corona | मुंबईत कोरोनाचा हाहा:कार, दिवसभरात तब्बल 11,163 नवे रुग्ण, तर 25 रुग्णांचा मृत्यू, संपूर्ण शहराची परिस्थिती काय?

कोरोनाचा नवा स्ट्रेन गरोदर महिलांसाठी घातक, पिंपरीत जुळ्यांना जन्म दिलेल्या मातेला कोरोनाने हिरावलं!

(coronavirus cases rising again in pune)

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.