AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणेकरांना मोठा दिलासा; कोरोना रुग्णसंख्या घटल्याने जम्बो कोव्हिड सेंटर अखेर बंद

Coronavirus in Pune | दुसऱ्या लाटेमुळे 22 मार्चपासून जम्बो कोव्हिड सेंटर पुन्हा सुरू करण्यात आले होते. दुसऱ्या लाटेत 22 मार्च ते 1 जुलै दरम्यान एकूण 3009 रुग्ण जम्बोमध्ये दाखल झाले होते.

पुणेकरांना मोठा दिलासा; कोरोना रुग्णसंख्या घटल्याने जम्बो कोव्हिड सेंटर अखेर बंद
पुणे जम्बो कोव्हिड सेंटर
| Edited By: | Updated on: Jul 03, 2021 | 3:39 PM
Share

पुणे: काही दिवसांपूर्वी राज्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या पुण्यातील परिस्थिती आता झपाट्याने सुधारताना दिसत आहे. कारण, कोरोना (Coroanvirus) रुग्णांची संख्या घटल्यामुळे सीओईपीच्या मैदानावरील जम्बो कोव्हिड सेंटर अखेर बंद करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्याच्यादृष्टीने हे चांगले लक्षण मानले जात आहे. (Pune Jumbo Covid centre close down due to patiets decreases)

जम्बो सेंटरमधील रुग्ण कमी झाल्यानंतर 1 जून रोजी रुग्णालयातील 300 ऑक्सिजन खाटा कमी करण्यात आल्या होत्या. पहिली लाट ओसरल्यानंतर जम्बो रुग्णालय 15 जानेवारी रोजी बंद करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या लाटेमुळे 22 मार्चपासून जम्बो कोव्हिड सेंटर पुन्हा सुरू करण्यात आले होते. दुसऱ्या लाटेत 22 मार्च ते 1 जुलै दरम्यान एकूण 3009 रुग्ण जम्बोमध्ये दाखल झाले होते. त्यापैकी 1909 जण बरे होऊन घरी परतले होते. तर 654 जणांचा मृत्यू झाला होता. पुन्हा गरज पडल्यास हे जम्बो कोव्हिड सेंटर पुन्हा कार्यान्वित केले जाईल, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली.

पुण्यात महानगरपालिका व्यापाऱ्यांना दुकानात जाऊन लस देणार

आगामी काळात कोरोनाचे सुपर स्प्रेडर ठरण्याची शक्यता असलेल्या व्यापाऱ्यांना दुकानात जाऊन लस देण्याची योजना महानगरपालिकेने आखली आहे. महापालिकेच्या वतीने लक्ष्मी रस्त्यावरील व्यापार्‍यांसाठी लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. ही मोहिम गुरुवारपासून लसीच्या (Coronavirus Vaccine) उपलब्धतेनुसार राबविली जाईल, अशी माहिती पालिकेच्यावतीने देण्यात आली. याशिवाय सध्या पुणे महानगरपालिकेकडून दिव्यांग, रस्त्यांवरील नागरिक, झोपडपट्ट्यांमधील नागरिकांचे लसीकरण सुरु असल्याचेही अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितले.

ऑक्सिजन निर्मितीत मुंबईची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल

कोरोना संकटाचा सामना करताना महाराष्ट्रात वैद्यकीय ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘मिशन ऑक्सिजन’च्या माध्यमातून राज्यात ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प उभारले जात आहे. या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन निर्मितीत मुंबईची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल सुरु आहे. मुंबई महापालिकेच्या 5 रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे.

मुंबई महापालिकेची ऑक्सिजन निर्मिती प्रक्रियेत स्वयंपूर्णतेकडे वाटचाल सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या पाच रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारले गेले आहेत. यात वरळीतील नेहरू सायन्स सेंटर, वांद्र्यातील भाभा रुग्णालय, राजावाडी रुग्णालय, कूपर रुग्णालय आणि कस्तुरबा रुग्णालय या पालिकेच्या पाच रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याचे काम सुरु आहे.

संबंधित बातम्या : 

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्ययंत्रणा बळकट करा, अजित पवारांचे निर्देश

Coroanvirus: मुंबईत 90 लाखांच्या टार्गेटपैकी 44 लाख नागरिकांचं लसीकरण संपन्न: आदित्य ठाकरे

Mumbai Corona | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तब्बल 7473 लहान मुलं बाधित, एकाचा मृत्यू

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.