Cyclone Tej | तेज चक्रीवादळाचा धोका वाढणार? महाराष्ट्रात काय परिणाम होणार
Cyclone Tej | परतीचा मान्सून देशातून गेल्यानंतर आता अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाले आहे. हे चक्रीवादळ रविवारी दुपारपर्यंत तीव्र होणार आहे. या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार याची माहिती आयएमडीने दिली आहे.
पुणे | 22 ऑक्टोंबर 2023 : अरबी समुद्रात तयार झालेला कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपातंर शनिवारी वादळात झाले. त्याला तेज हे नाव देण्यात आले आहे. रविवारी दुपारपर्यंत हे वादळ तीव्र होण्याचा धोका आहे. या वादळाचा महाराष्ट्र आणि देशात काय परिणाम होणार? याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर काही परिणाम होणार नाही. परंतु दक्षिणेकडील हवामानावर त्याचा परिणाम होणार आहे. यामुळे तामिळनाडूत वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. चक्रीवादळ 25 ऑक्टोबर रोजी येमेन आणि ओमान दरम्यान जाणार आहे. त्यानंतर हे वादळ शांत होईल, असे आयएमडीने म्हटले आहे.
कोकणातील धोका टळला?
काही दिवसांपूर्वी अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर 21 ऑक्टोबर रोजी तेज या चक्रीवादळात झाले. आता तेज चक्रीवादळ पाकिस्तानच्या दिशेने सरकले आहे. पाकिस्तानच्या नैऋत्येला 1850 किमी अंतरावर कराची दरम्यान चक्रीवादळाची व्याप्ती सध्या दिसत आहे. या चक्रीवादळाचा कोकणावरील धोका टळला आहे. कोकणात या वादळाचा परिणाम होणार नसल्याची माहिती हवामान विभागाने दिली.
21 Oct,Very Severe Cyclonic Storm Tej at 2030𝚑rs;~380𝚔𝚖 𝚏𝚛𝚖 Socotra (Yemen),730km 𝚂𝚊𝚕𝚊𝚕𝚊𝚑,770km Al Ghaidah.Very likly to intensify to Extremely Severe CS in forenoon of 22 Oc𝚝.Likly to cross Yemen-Oman coasts betn Al Ghaidah & Salalah arnd early hrs of 25 Oct-IMD pic.twitter.com/Oo0zP3D9Oj
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 21, 2023
चक्रीवादळाचा वेग काय
तेज चक्रीवादळ सध्या 89-117 किमी प्रतितास वेगाने पुढे सरकत आहे. रविवारी या वादळाचे रुपातंर ‘तीव्र चक्री वादळात होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला. तेज चक्रीवादळ सध्या नैऋत्य अरबी समुद्रातून पुढे जात आहे. हे वादळ येमेनजवळ 600 किमी पूर्व-आग्नेयेकडे सरकत आहे. 25 ऑक्टोबर रोजी येमेन आणि ओमान दरम्यान असणार आहे. त्यानंतर हे वादळ शांत होणार आहे.
तटरक्षक दल अलर्ट मोडवर
तेज चक्रीवादळाचा धोका दक्षिण भारतात असणार आहे. यामुळे या ठिकाणी तटरक्षक दलास अलर्ट राहण्याचे सांगितले आहे. या चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन आंधप्रदेश आणि तामिळनाडूमधील किनारपट्टीवर सावधानतेचा इशारा दिला आहे. मासेमारी करण्यासाठी समुद्रात न जाण्याचे सांगितले आहे. चक्रीवादळ उत्तर-पश्चिमकडे जात आहे. दक्षिण ओमान आणि यमन किनाऱ्यावर पोहचल्यानंतर वादळ शांत होणार आहे.