राज्यातील सांस्कृतिक कला केंद्रांमध्ये डान्स बार, लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचा थेट धिंगाण्याचा व्हिडिओ दाखवत खळबळजनक आरोप
Pune Surekha Punekar: डान्स बार राज्यात बंदी असल्याचा दावा केला जात आहे. परंतु सर्रासपणे अनेक संस्कृतिक कला केंद्रामध्ये खुलेआम डान्स बार, डीजे सुरु असल्याचा आरोप लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी केला आहे. सुरेखा पुणेकर म्हणाल्या, राज्यातील ८२ पैकी ४२ कला केंद्रांमध्ये डान्स बार, डीजे सुरु आहे.

Pune Surekha Punekar: राज्यात डान्स बारवर बंदी आहे. त्यानंतर विविध मार्गाने डान्स बार सारखा प्रकार सर्रासपणे सुरु आहे. राज्यातील अनेक संस्कृतिक कला केंद्रामध्ये डान्स बार आणि डीजे सुरु आहे, असा दावा लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी पुण्यात शुक्रवारी केला. पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन सुरखा पुणेकर यांनी यासंदर्भातील व्हिडिओसुद्धा दाखवला. या व्हिडिओमध्ये सांस्कृतिक कला केंद्रामध्ये सुरू असलेला धिंगाणा दिसत आहे.
डान्स बार राज्यात बंदी असल्याचा दावा केला जात आहे. परंतु सर्रासपणे अनेक संस्कृतिक कला केंद्रामध्ये खुलेआम डान्स बार, डीजे सुरु असल्याचा आरोप लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी केला आहे. सुरेखा पुणेकर म्हणाल्या, राज्यातील ८२ पैकी ४२ कला केंद्रांमध्ये डान्स बार, डीजे सुरु आहे. त्या ठिकाणी काय, काय प्रकार सुरु आहे, त्याचे धक्कादायक व्हिडिओ सुरेखा पुणेकर यांनी दाखवले.
काय आहे त्या व्हिडिओमध्ये
राज्यात बेकायदेशीपण सुरु असलेल्या या डान्सबारवर तात्काळ बंदी आणली पाहिजे. या डान्सबारमुळे अनेक संगीतकार, कलाकार, वाजंत्री हे देशोधडीला लागले असल्याचे मत सुरेखा पुणेकर यांनी व्यक्त केले. सुरेखा पुणेकर यांनी दाखवलेल्या व्हिडिओमध्ये साडी नेसलेली महिला डान्स करताना दिसत आहे. त्या महिलेसोबत तरुण अश्लिल चाळे करताना दिसत आहे. सुरेखा पुणेकर यांनी माध्यमांना दिलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.




लावणी म्हणजे सुरेखा पुणेकर समीकरण
प्रसिद्ध लोककलावंत अशी ओळख असलेल्या लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी लावणीला जनमाणसात रुजवण्याचे काम केले. वयाच्या आठव्या वर्षी पारावरच्या तमाशापासून त्यांनी लोककलेच्या क्षेत्रात पाऊल ठेवले. चंद्रकांत ढवळपुरीकर यांच्या फडात त्यांनी काम केले. या क्षेत्रात त्यांनी केलेल्या मोठ्या कामामुळे लावणी म्हणजे सुरेखा पुणेकर असे समीकरण तयार झाले. त्यांनी आता राजकारणातही प्रवेश केला आहे. त्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत.