Gautami Patil | ‘मी त्यांना गद्दार म्हणणार नाही’, गौतमी पाटीलचा निशाणा कुणावर?

डान्सर गौतमी पाटील हिने आज महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. गौतमी तिच्या डान्स ग्रुपसह राज्यभरात कार्यक्रम करते. तिचं आपल्या डान्स ग्रुपमधील मुलींसोबत चांगलं भावनिक नातं आहे. ती अनेकदा माध्यमांसमोर बोलताना आपल्या डान्स ग्रुपबद्दल बोलत असते.

Gautami Patil | 'मी त्यांना गद्दार म्हणणार नाही', गौतमी पाटीलचा निशाणा कुणावर?
Follow us
| Updated on: Dec 13, 2023 | 7:07 PM

पुणे | 13 डिसेंबर 2023 : डान्सर गौतमी पाटील नेहमी चर्चेत असते. गौतमी पाटील गेल्या वर्षभरापासून चांगलीच चर्चेत आली आहे. तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात अनेकदा गोंधळ झाल्याची बातमी समोर येत असते. तिच्या कार्यक्रमावेळी कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा देखील फौजफाटा कार्यक्रमस्थळी तैनात असतो. गौतमीचा कार्यक्रम पाहायला तिच्या चाहत्यांची तुफान गर्दी असते. गौतमी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी गौतमी पाटील हिच्या ग्रुपमधील एक डान्सर हिंदवी पाटील हिने एक्झिट घेतल्याची माहिती समोर आली होती. हिंदवी आता स्वत: गौतमी सारखे कार्यक्रम करते. ती स्वत: एका डान्सर ग्रुपचं नेतृत्व करते, अशी चर्चा सुरु असते. याबाबत गौतमी पाटील हिला प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने भूमिका मांडली.

गौतमी पाटील हिचे डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. गौतमी पाठोपाठ हिंदवी पाटील हिचेदेखील डान्स व्हिडीओ इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत असतात. गौतमी प्रमाणेच हिंदवी हिच्या डान्स व्हिडीओवरदेखील चाहत्यांचा लाईक्सचा पाऊस पडतो. याशिवाय गौतमी पाटील आणि हिंदवी पाटील हे आता व्यावसायिक दृष्टीकोनाने प्रतिस्पर्धी झाले आहेत. त्यामुळे तिने गौतमीच्या डान्स ग्रुपला सोडचिठ्ठी दिल्याने गौतमीचं काही नुकसान झालं का? किंवा गौतमी त्यातून नाराज झाली का? याबाबत चाहत्यांमध्ये चर्चा सुरु असते. असं असताना आता गौतमीने हिंदवी हिच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलंय.

गौतमी हिंदवी हिच्याबद्दल नेमकं काय म्हणाली?

गौतमीला डान्सर हिंदवी पाटील हिच्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर गौतमीने हिंदवीला शुभेच्छा दिल्या. “मी 11 वर्षांपासून या क्षेत्रात काम करते. अनेक मुली माझ्या हाताखालून गेल्या आहेत. हिंदवी पाटीलचं चांगलं होवो. आमच्यातून कोण फुटून गेलं तर आम्ही त्याला गद्दार अजिबात म्हणत नाही. उलट त्यांचं चांगलं होऊ दे”, असं गौतमी पाटील म्हणाली.

“मी अजिबात राजकारणात जाणार नाही”, असंही गौतमी पाटीलने यावेळी स्पष्ट केलं. याशिवाय नवा चित्रपट मिळाला तर करेन”, असं गौतमीने सांगितलं. “चित्रपट मिळाला तरी डान्स करणे सोडणार नाही”, असंही गौतमीने यावेळी सांगितलं. याशिवाय “सध्या माझ्या डोक्यात लग्नाचा अजिबात विचार नाही”, असं गौतमी पाटील म्हणाली. दरम्यान, “कोरोना काळात माझी सुद्धा परिस्थिती खूप हालाखीची होती. हे क्षेत्र चालायला हवं. सध्या सगळं नीट सुरू आहे”, असं गौतमी पाटील हिने यावेळी सांगितलं.

महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?.
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी.
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य.
मुख्यमंत्री, मुंडेंशी चर्चा अन् वाल्मीक कराडच्या 'सरेंडर'वरून शंका
मुख्यमंत्री, मुंडेंशी चर्चा अन् वाल्मीक कराडच्या 'सरेंडर'वरून शंका.
Santosh Deshmukh : वाल्मिक कराडचा व्हिडीओ, सरेंडर आधी नेमकं काय घडलं?
Santosh Deshmukh : वाल्मिक कराडचा व्हिडीओ, सरेंडर आधी नेमकं काय घडलं?.
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.