गिरीश महाजन साठीच्या पुढे गेले पण…; अजितदादा यांच्याकडून महाजन यांच्या फिटनेसचं कौतुक

महायुतीच्या माध्यमातून आम्ही कामे करत आहोत. सरकारी दवाखान्यात सामान्य नागरिकांकडून एक रुपया देखील घेतला जाणार नाही. सगळे उपचार मोफत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गिरीश महाजन साठीच्या पुढे गेले पण...; अजितदादा यांच्याकडून महाजन यांच्या फिटनेसचं कौतुक
girish mahajanImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 06, 2023 | 1:23 PM

पुणे | 6 ऑगस्ट 2023 : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या फिटनेसचं प्रचंड कौतुक केलं. आमच्या मंत्रिमंडळात सर्वात फिट मंत्री गिरीश महाजन आहेत. साठीच्या पुढे गेले पण कुणीच म्हणणार नाही की ते साठीच्या पुढे गेले. इरशाळवाडी सारख्या ठिकाणी गिरीश महाजन ट्रेकिंग करत गेले. इरशाळवाडीत ते सर्वात आधी पोहोचले. त्या टेकडीवर ते एकटे चढून गेले. महाजनांनी त्यांचं आरोग्य फिट ठेवलं आहे. महाजनांचा दंड मी नेहमीच दाबून बघतो. ते खूप फिट आहेत, असं कौतुक करतानाच तुम्हीही फिटनेस ठेवा. आरोग्य सांभाळा असं आवाहन अजित पवार यांनी केलं.

पुण्यात मोफत महाआऱोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. पुण्याचे दिवंगत माजी आमदार विनायक निम्हण यांच्या जयंती निमित्त पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर हे महाआरोग्य शिबीर सुरू आहे.यावेळी ते बोलत होते. देशाच्या आणि राज्यातल्या जनतेचे आरोग्य चांगले राहावे हीच अपेक्षा आहे. सर्व सामान्य नागरिकांच्या आरोग्याचा विचार होत आहे याबद्दल आभारी आहे. अलिकडे उपचाराचे खर्च वाढले आहेत, त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या, असं आवाहन अजित पवार यांनी केलं.

हे सुद्धा वाचा

आबांसारखं कुणी नाही

यावेळी त्यांनी विनायक निम्हण यांच्या आठवणींना उजाळा दिला. विनायक निम्हण यांच्या सारखा दिलदार मित्र आणि सहकारी होणे नाही. आबांनी मैत्री खूप चांगल्या पद्धतीने जपली आणि शेवटपर्यंत टिकवली, असं ते म्हणाले.

आरोग्याकडे लक्ष द्या

बाळासाहेबांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या आपला दवाखानासाठी 210 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महायुती लोकांनां जे जे देता येईल, सामान्य नागरिकांसाठी जे जे करता येईल ते करत आहे, असं सांगतानाच सगळ्यांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे, असंही ते म्हणाले.

सरकारी रुग्णालयात मोफत उपचार

महायुतीच्या माध्यमातून आम्ही कामे करत आहोत. सरकारी दवाखान्यात सामान्य नागरिकांकडून एक रुपया देखील घेतला जाणार नाही. सगळे उपचार मोफत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता सरकारी दवाखान्यात एक रुपयाही द्यावा लागणार नाही, असं सांगतानाच सध्या राज्यभर डोळ्यांची साथ आहे. पुण्यात राज्यभरातील सगळ्यात जास्त रुग्ण आहेत. साथीच्या आजारांपासून वाचण्यासाठी सगळ्यांनी काळजी घ्या. वयाच्या 40 नंतर रोज व्यायाम करा, व्यसनापासून दूर राहा, सिगारेट, दारु पासून दूर रहा, असं आवाहनही त्यांनी केली.

कोरोना काळात चांगलं काम

कोरोना काळात आरोग्य सेवेची गरज उभ्या जगाला कळाली. आरोग्य क्षेत्रातील लोकांनी कोरोना काळात खूप कामं केलं. त्याचे देखील आभार. महाराष्ट्राने कोरोना काळात केलेल्या कामाची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली, असं ते म्हणाले. विशेष म्हणजे भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन यांच्यासमोरच त्यांनी हे विधान करत उद्धव ठाकरे सरकारची एकप्रकारे स्तुतीच केली.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.