पुण्याच्या ‘डेक्कन कॉलेज’ची द्विशताब्दीकडे वाटचाल, 4 नव्या अभ्यासक्रमांची घोषणा, टपाल तिकीटही काढलं जाणार

'डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था अभिमत विद्यापीठा'वर टपाल विभाग (Special Post Ticket) ५ रुपयांचं खास तिकीटही काढणार आहे. आपल्या द्विशताब्दी वर्षानिमित्त विद्यापीठाकडून वेगवेगळ्या विषयांच्या ४ अभ्यासक्रमांची घोषणाही करण्यात आली आहे.

पुण्याच्या 'डेक्कन कॉलेज'ची द्विशताब्दीकडे वाटचाल, 4 नव्या अभ्यासक्रमांची घोषणा, टपाल तिकीटही काढलं जाणार
डेक्कन कॉलेज, पुणे
Follow us
| Updated on: Aug 18, 2021 | 5:21 PM

पुणे : पुण्यातलं (Pune) प्रसिद्ध आणि राज्यातल्या जुन्या महाविद्यालयांपैकी एक म्हणून नावलौकिक असलेलं डेक्कन कॉलेज (Deccan College) यंदा आपली द्विशताब्दी (Bicentennial Year) साजरी करणार आहे. त्यानिमित्त ‘डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था अभिमत विद्यापीठा’वर टपाल विभाग (Special Post Ticket) ५ रुपयांचं खास तिकीटही काढणार आहे. आपल्या द्विशताब्दी वर्षानिमित्त विद्यापीठाकडून वेगवेगळ्या विषयांच्या ४ अभ्यासक्रमांची घोषणाही करण्यात आली आहे. (Deccan College autonomous university celebrating its 200 years and announces 4 new courses)

‘डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था अभिमत विद्यापीठ’ यंदा आपलं द्विशताब्दी वर्ष साजरं करत आहे. त्यानिमित्त वर्षभर वेगवगेळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये वेगवेगळ्या कार्यशाळा, व्याख्याने, परिषदांसह कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे.

४ नव्या अभ्यासक्रमांची घोषणा

कॉलेजमध्ये आता पुरातत्व, भाषाशास्त्र आणि संस्कृत आणि कोशशास्त्र अशा ३ विभागांमधल्या विषयांत पदव्युत्तर अभ्यासक्रम आहेत. सोबतच पदवी आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमात अनेक विषय शिकवले जातात. आता विद्यापीठाने आणखी ४ नव्या अभ्यासक्रमांची घोषणा केली आहे. यामध्ये पर्यावरणीय पुरातत्व, संगणकीय भाषाशास्त्र, वस्तुसंग्रहायलशास्त्र आणि वारसास्थळ व्यवस्थापन आणि वैज्ञानिक संवर्धन या विषयांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

याबाबत केंद्र आणि राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवला असल्याचं सांगण्यात आलं आहे. विद्यापीठाची शैक्षणिक परिषद, व्यवस्थापन परिषद आणि राज्य सरकारच्या उच्च शिक्षण विभागाच्या मान्यतेनंतर हे अभ्यासक्रम सुरु केले जाणार आहेत.

६ ऑक्टोबरला विशेष टपाल तिकीटाचं अनावरण

डेक्कन कॉलेजची इमारत ही गोथिक वास्तुशास्त्राचा सुंदर नमुना आहे. सर जेमशेटजी जिजॉभाई यांच्या एक लाख रूपये देणगीतून ही वास्तू साकारण्यात आली आहे. टपाल विभाग डेक्कन कॉलेजटी इमारत असलेलं ५ रुपयांचं खास तिकीट काढत आहे. ६ ऑक्टोबरला डेक्कन कॉलेजचा द्विशताब्दी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात विशेष टपाल तिकीटाचं प्रकाशन करण्यात येणार आहे. यासोबतच कॉलेजच्या आवारात डेक्कन कॉलेज ट्रस्टने समकालीन भारतविद्या संस्था स्थापन करण्याचा ठराव मंजूर केला आहे.

संबंधित बातम्या :

पुणे विद्यापीठाचा देशात डंका! संरक्षण विभागात स्थापन होणार ‘चेअर ऑफ एक्सलन्स’

पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये ११ वी प्रवेश प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद, ५३ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी, प्रक्रियेबाबत एकही तक्रार नाही!

MPSC चा विद्यार्थ्यांसाठी ॲलर्ट, राज्यसेवा, वनसेवेसेह अभियांत्रिकी परीक्षेतील पदांचा प्राधान्यक्रम नोंदवण्याचं आवाहन

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.