उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयुक्तांना सुनावले खडेबोल, कारण…

Pune News | चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना अजित पवार यांनी खडेबोल सुनावले. राजकीय कार्यक्रम असताना पत्रकारांना त्या नेत्यांपर्यंत पोहचू दिले जात नाही. पत्रकारांनी हा विषय मांडताच अजित पवार यांनी पत्रकारांसमोरच हा विषय सोडवला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयुक्तांना सुनावले खडेबोल, कारण...
Follow us
| Updated on: Jan 20, 2024 | 12:39 PM

रणजित जाधव, पुणे, दि.20 जानेवारी 2024 | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार कोणाची मुलाहिजा ठेवत नाही. आपल्या रोखठोक स्वभावामुळे ते ओळखले जातात. चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना अजित पवार यांनी खडेबोल सुनावले. राजकीय कार्यक्रम असताना पत्रकारांना त्या नेत्यांपर्यंत पोहचू दिले जात नाही. त्यांना लांब ठेवले जात आहे. मागील आठवड्यामध्ये पिंपरीत उपमुख्यमंत्री अन् गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आयुक्त विनयकुमार चौबे यांना सांगितले होते. त्यानंतर पुन्हा तोच प्रकार घडला. यावेळी सर्व माध्यमांच्या पत्रकारांनी अजित पवार यांना याबाबत सांगितले. त्यानंतर अजित पवार यांनी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना बोलवून खडे बोल सुनावले. त्यांनी विनय कुमार चौबे यांना चांगलेच फैलावर घेतले.

पुन्हा तोच प्रकार अन्…

पिंपरी- चिंचवड शहरात राजकीय नेत्यांच्या दौऱ्यावेळी पत्रकारांची पोलीस अडवणूक करत आहेत, असे वारंवार समोर आलेले आहे. गेल्या आठवड्यामध्ये राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना समोरासमोर बोलवून सांगितले. त्यानंतर आज पुन्हा तोच प्रकार घडला.

शनिवारी अजित पवार यांचा पिंपरी- चिंचवड शहरातील रामकृष्ण मोरे नाट्यगृहात कार्यक्रम पार पडला. त्यानंतर प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी त्यांचा बाईट घेण्यासाठी पुढे सरसावले. परंतु पोलिसांनी पत्रकारांना अडवले. यामुळे पुन्हा एकदा पिंपरी- चिंचवड पोलीस प्रसारमाध्यमांच्या पत्रकारांची अडवणूक करत आहेत का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

हे सुद्धा वाचा

पत्रकारांची तक्रार…अन् अजित पवार यांची अ‍ॅक्सन

अजित पवार यांच्याकडे पत्रकारांनी हा विषय मांडला. त्यानंतर अजित पवार यांनी पत्रकारांच्या समोरच पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना बोलवून चांगलेच खडेबोल सुनावले. पत्रकारांचा तो अधिकार आहे. त्यांना अडवू नये, संबंधित नेते बोलायचे की नाही ते ठरवतील असे म्हणत त्यांनी विनयकुमार चौबे यांना फैलावर घेतले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.