लोकांचे लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करण्यापेक्षा त्यांचे प्रश्न पहा; किरीट सोमैय्यांवर अजित पवारांची प्रतिक्रिया

कोरोना संदर्भात आपली काय लाईन ऑफ ॲक्शन आहे ती माहिती घेतली पाहिजे आणि इतर अडचणी सोडवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. मी ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर होतो. हा कार्यक्रम संपल्यावर मी मुंबईला आहे या प्रकरणी माहिती घेतो त्यानंतर मी प्रतिक्रिया देतो, असे अजित पवार यांनी सांगितले.

लोकांचे लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करण्यापेक्षा त्यांचे प्रश्न पहा; किरीट सोमैय्यांवर अजित पवारांची प्रतिक्रिया
लोकांचे लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करण्यापेक्षा लोकांचे प्रश्न पहा
Follow us
| Updated on: Sep 19, 2021 | 8:59 PM

मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांनतर राज्यात खळबळ उडालेली आहे. मुश्रीफ यांच्या घोटाळ्याची सविस्तर माहिती घेण्यासाठी सोमय्या 20 सप्टेंबर रोजी कोल्हापुरात जाणार आहेत. तर दुसरीकडे सोमय्या यांना कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस आली असून त्यांना कोल्हापूर जिल्ह्यात येण्यास मनाई करण्यात आली आहे. दरम्यान याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विचारले असता त्यांनी किरीट सोमय्या प्रकरणी मुंबईला गेल्यानंतर ह्याची माहिती घेऊन सांगेन असे ते म्हणाले. पुण्यातील बालेवाडी भागात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सागर बालवडकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते. (deputy chief minister Ajit Pawar’s reaction on bjp leader Kirit Somaiya)

मला याबद्दल काहीच माहिती नाही मी विकास कामाला महत्त्व देतो आम्ही सकाळी सहाला कामाला सुरुवात करतो आणि विकास कामाला महत्त्व देतो लोकांच्या कामाला आणि अडीअडचणीला महत्त्व देतो. लोकांचे लक्ष वेगळ्या कारणाने दुसरीकडून डायव्हर्ट करण्यापेक्षा लोकांचे प्रश्न काय आहेत ते पहा. कोरोना संदर्भात आपली काय लाईन ऑफ ॲक्शन आहे ती माहिती घेतली पाहिजे आणि इतर अडचणी सोडवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. मी ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर होतो. हा कार्यक्रम संपल्यावर मी मुंबईला आहे या प्रकरणी माहिती घेतो त्यानंतर मी प्रतिक्रिया देतो, असे अजित पवार यांनी सांगितले.

काय म्हणाले अजित पवार?

मुंबईनंतर पिंपरी चिंचवड आणि पुणे वाढत असताना समाविष्ट गावाला सुविधा मिळाल्या पाहिजेत. सार्वजनिक कामाला आणि मार्ग काढण्याचा माझा प्रयत्न करतो. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या माध्यमातून म्हाडाच्या घराची सोडत काढली आहे. काहींना घर घ्यायला परवडत नाही म्हणून ही सुविधा केल्याचे ते म्हणाले. तसेच पिण्याच्या पाण्याची अडचण ही गोष्ट खरी आहे. पुण्याची वाढती लोकसंख्या पाहता ही अडचण येत आहे. त्यामुळे शेतीचं पाणी हिकडं वळवायला लागत आहे. यामुळे शेतीला देखील अडचण येत आहे.

मुळशी धरणातील 1 टीएमी पाणी मुळा नदीत सोडण्याचा निर्णय घेतला, हे सर्व होत असताना समनव्य महत्वाचा असल्याचेही अजित पवार यांनी नमूद केले. मलाही खात्री आहे 100% काम होत नाही. ओळख कमी असेल की ती काम होत नाहीत. पण प्रयत्न करत रहायचे. चर्चेतून चांगले मार्ग निघतात जर चर्चा नाही केली तर मार्ग निघत नाही, असे ते पुढे म्हणाले.

महाराष्ट्रातील प्रश्न सोडवण्यासाठी शरद पवार आणि आम्ही प्रयत्न करत आहोत. पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास झाला पाहिजे, काही जण झोपेत असतील तेव्हा माझं काम सुरू असतं. आम्ही शेतकरी वर्गातील आहोत, त्यामुळे शेतीला वापसा मिळाला पाहिजे. सोशल मिडियामुळे सगळे जवळ आलेत त्यातील चांगलं घ्या वाईट मार्गाला जाऊ नका.

शाळेसाठी 65 हजार कोटींचा निधी

शाळेसाठी 65 हजार कोटींचा निधी देत असल्याचे अजित पवार यांनी यावेळी जाहीर केले. खाजगी आणि शासकीय शाळांमध्ये मोठी तफावत आहे. कुठलाही मुलगा किंवा मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी आपण प्रयत्नशील असून शाळेसाठी 65 हजार कोटी शाळेसाठी निधी देत आहोत, असे पवार म्हणाले.

दुसऱ्यांदा कोरोनाच्या सावटामुळे साधेपणाने गणपती उत्सव साजरा केला. असल्या कार्यक्रमावर बंदी आणायला मुख्यमंत्री आणि आम्हाला पण बरं वाटत नाही. पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मेट्रोचं काम सुरू आहे. तिकडं पिंपरी चिंचवडमधील निगडीपर्यंत घेऊन जाण्याचा काम सुरू आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले. (deputy chief minister Ajit Pawar’s reaction on bjp leader Kirit Somaiya)

इतर बातम्या

PHOTO: IPL मध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारे फलंदाज, एका दिग्गज कर्णधाराचाही समावेश

दोन महिन्यांचं वीजबिल भरलं नाही, वीज कापताच पोलिसाची महावितरणाच्या कर्मचाऱ्याला मारहाण

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.