AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | तराफ्याचे इंजिन बंद, भल्या पहाटे अजित पवार धरणाच्या मधोमध अडकले

पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार कासारसाई धरणावर गेले होते. तराफ्यावर बसून मत्स्य व्यवसायाची पाहणी करत होते. यावेळी अचानक तराफ्याचे इंजिन बंद पडले.

VIDEO | तराफ्याचे इंजिन बंद, भल्या पहाटे अजित पवार धरणाच्या मधोमध अडकले
अजित पवार धरणाच्या मधोमध अडकले
| Edited By: | Updated on: Oct 08, 2021 | 8:35 AM
Share

पुणे : पुण्याच्या कासारसाई धरणाच्या मधोमध पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) अडकले होते. तराफ्यावर बसून मत्स्य व्यवसायाची पाहणी करायला गेले असताना तराफ्याचे इंजिन अचानक बंद पडले. अखेर दुसऱ्या बोटीत रवानगी केल्यानंतर त्यांची सुटका झाली.

नेमकं काय घडलं?

पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार कासारसाई धरणावर गेले होते. तराफ्यावर बसून मत्स्य व्यवसायाची पाहणी करत होते. यावेळी अचानक तराफ्याचे इंजिन बंद पडले.

दुसऱ्या बोटीतून पुढचा प्रवास

चालकाने इंजिन सुरु करण्याचे प्रयत्न केले, पण ते सुरु होईना. शेवटी लगतची बोट जवळ घेण्यात आली. त्यानंतर अजितदादा दुसऱ्या बोटीत बसले आणि पुढचा प्रवास सुरु झाला.

अजितदादांच्या सूचनेकडे दुर्लक्ष

सुरुवातीलाच अजित पवारांनी जास्तीचे लोक तराफ्यात बसवू नका, अशी तंबी दिली होती. मात्र तरीही उपस्थितांनी तराफ्यावर गर्दी केली आणि अधिकच्या वजनाने इंजिनवर ताण आला. त्यामुळे इंजिन बंद पडून तराफा मध्येच अडकला होता.

पाहा व्हिडीओ :

“ढगात गोळ्या मारू नका”

दरम्यान, अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार, बहिणी आणि निकटवर्तीयांच्या संबंधित ठिकाणांवर काल दिवसभर धाडी पडल्या होत्या. “मी सांगितलेलं आहे, सारखं सारखं मी सांगायची गरज नाही.  एकदा ती प्रक्रिया पूर्ण होऊ द्या. ढगात गोळ्या मारू नका. जे असेल ते दूध का दूध पाणी का पाणी पुढे येईल” अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.

पार्थ पवारांच्या मुंबईतील कार्यालयावर छापा

अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने काल छापा टाकला होता. विशेष म्हणजे कालपासून आयकर विभागाच्या रडारवर अजित पवार आहेत. पार्थ पवार यांच्या मुंबईतील नरिमन पॉईंट येथील कार्यालयावर छापेमारी झाली, त्याआधी आयकर विभागाने अजित पवार यांच्या तीन बहिणींच्या घरावरही छापा टाकला होता. यापैकी एक बहीण कोल्हापूर तर इतर दोन बहिणी पुण्यात वास्तव्यास आहेत. त्यानंतर आता पार्थ पवारांच्या कार्यालयावरही आयकर विभागाने छापा टाकला.

संबंधित बातम्या :

अजित पवारांच्या निकटवर्तीयांवर दिवसभर धाडी, दिल्लीतून जारी करण्यात आलेली आयकर विभागाची प्रेस नोट जशीच्या तशी

अजित पवारांनी जरंडेश्वर कारखान्याबाबत संपूर्ण माहिती द्यावी, किरीट सोमय्यांचं आव्हान

भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसचा धसका का घेतला? जयंत पाटलांचा खोचक सवाल

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.