Video : पुरणपोळी आणि नळीचं नाव महाराष्ट्राबाहेर नेल्यास तुमचा अभिमान वाटेल, धनंजय मुंडे यांचं तरुणाईला आवाहन
धनंजय मुंडे काल पुण्याच्या (Pune) दौऱ्यावर होते. पुण्यातील चाकण परिसरातील एका हॉटेलचं (Hotel) त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं.
सुनिल थिगळे, टीव्ही 9 मराठी, पुणे: सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे त्यांच्या भाषणाच्या स्टाईलनं चर्चेत असतात. धनंजय मुंडे काल पुण्याच्या (Pune) दौऱ्यावर होते. पुण्यातील चाकण परिसरातील एका हॉटेलचं (Hotel) त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी सामाजिक न्यायमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीनं देशात वेगळा ठसा उमटवण्याची गरज व्यक्त केली. महाराष्ट्राची पुरणपोळी आणि मटन म्हणजेच नळीचं नाव आपल्याला महाराष्ट्राबाहेर कुठं आढळतं नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. मराठी तरुणांनी आपल्या राज्यातील खाद्यपदार्थ महाराष्ट्राच्या बाहेर पोहोचवावेत. हे ज्यावेळी घडेल त्यावेळी मला अभिमान वाटेल, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं. देशभरात महाराष्ट्रातील खाद्यपदार्थांऐवजी गुजराती डिशचं नाव जास्त प्रमाणात घेत असल्याचंही म्हटलं. धनंजय मुंडे यांनी मराठी तरुणांनी राज्याच्या सीमा पार करुन खाद्यपदार्थ देशभरात पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं.
देशात कुठंही गेलं तरी गुजराथी डिशचं नाव जास्त
धनंजय मुंडे यांनी आपण ज्यावेळी महाराष्ट्र सोडून देशातील कोणत्याही भागात जातो. त्यावेळी जेव्हा हॉटेलमध्ये जेव्हा जेवणासाठी जातो तेव्हा हॉटेलमध्ये फक्त गुजराथी डिश जास्त दिसतात. महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ कमी प्रमाणात दिसतात, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
पाहा व्हिडीओ:
Video : पुरणपोळी आणि नळीचं नाव महाराष्ट्राबाहेर नेल्यास तुमचा अभिमान वाटेल, धनंजय मुंडे यांचं तरुणाईला आवाहन pic.twitter.com/QZzOIwmz0u
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 11, 2022
मराठी तरुणांनी हिमतीनं पुढं यावं
महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीचा भाग असणारे पदार्थ देशभरात म्हणजेच दिल्ली किंवा इतर राज्यात पोहोचवण्यासाठी मराठी तरुणांनी हिमतीनं उठावं, असं आवाहन धनंजय मुंडे यांनी केलं.
तेव्हा मला अभिमान वाटेल
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्रातील तरुणांनी हिमतीनं उठून आपल्या राज्यातील खाद्यपदार्थ म्हणजेच पुरणपोळी आणि नळी देशात पोहोचवावी म्हणजे तेव्हा मला अभिमान वाटेल, असं म्हटलं.
पुरणपोळी आणि नळीचं नाव घेतलं जातं नाही
देशात कुठंही जेवणासाठी गेल्यानंतर हॉटेल मध्ये फक्त गुजराथी डिशच जास्त नाव घेतलं जातं. अजूनही देशात आपली अस्सल पुरण पोळी आणि नळीचं नाव घेतल जात नाही, याची खंत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी पुण्यातील चाकण येथे एका हॉटेलच्या उदघाटन प्रसंगी केली आहे. आपल्या महाराष्ट्र मधील मराठी तरुण हिमतीने उठून दिल्लीत किंवा इतर राज्यात आपल्या महाराष्ट्राच्या डिशच नाव काढतील तेव्हा मला अभिमान वाटेल, असं धनंजय मुंडे म्हणाले.
इतर बातम्या :
Navneet Rana : राज्यातलं आणखी एक भांडण दिल्ली दरबारी, नवनीत राणा लोकसभेत का कडाडल्या?
Dhananajay Munde appeal Marathi Youth to make efforts for food items of Maharashtra Meat and Puran Poli will available at other states