भाजपमध्ये नाराजी, नेत्यांची धावाधाव, मविआमध्ये धुसफूस, उमेदवारी रखडली

कसबा पेठेतील जातीय समीकरण पाहिलं तर मराठा आणि ओबीसी वर्ग 35 टक्के आहेत. ब्राह्मण समाज 25 ते 30 टक्के आहे. त्यामुळे या समाजाची नाराजी परवडणारी नाही.

भाजपमध्ये नाराजी, नेत्यांची धावाधाव, मविआमध्ये धुसफूस, उमेदवारी रखडली
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Feb 06, 2023 | 9:22 AM

पुणे: भारतीय जनता पक्षाने पुणे शहरातील कसबा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केले. उमेदवार देताना टिळक घराण्याला डावललं आहे. त्याऐवजी हेमंत रासणे यांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारी न मिळाल्यामुळे शैलेश टिळक नाराज झाले. त्यांनी जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवली. ब्राम्ह्यण समाजाला प्रतिनिधित्व नसल्याने समाज नाराज होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मग भाजप नेत्यांची धावाधाव सुरु झाली. भाजपचे संकट मोचक गिरीश महाजन त्यांच्या घरी गेले. त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

पुणे कसबा पेठ येथील भाजप उमेदवारावरुन ब्राम्ह्यण समाजात नाराजी निर्माण झाली आहे. हिंदू महासंघाचे आनंद दवे म्हणाले, भाजपने आधी मेधा कुळकर्णी, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता टिळक कुटुंबीयांना संधी नाकारली. भाजपला काही जातींची मते हवी आहेत.

आम्ही लवकरच कसब्यातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे ही निवडणूक भाजपसाठी डोकेदुखी ठरणार आहे. आधी टिळक परिवार नाराज असताना ब्राम्ह्यण समाजाची नाराजी भाजपला परवडणारी नाही. कसबा पेठेतील जातीय समीकरण पाहिलं तर मराठा आणि ओबीसी वर्ग 35 टक्के आहेत. ब्राह्मण समाज 25 ते 30 टक्के, मागासवर्गीय समाज 18 टक्के तर 10 टक्के मुस्लीम समाज आहे. ब्राम्ह्यण समाज भाजपचा मागे नेहमी राहिला. परंतु आता त्याची नाराजी भाजपला दूर करावी लागणा आहे.

हे सुद्धा वाचा

कोण आहेत हेमंत रासने?

भाजपने उमेदवारी दिलेले हेमंत रासने पुण्यातून 4 वेळा नगरसेवक राहिलेत. पुणे महापालिकेचं स्थायी समितीचे अध्यक्षही होते. श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर ट्रस्टचे विश्वस्त आहेत. भाजपचे खासदार गिरीश बापटांचे निकटवर्तीय आहेत. कसबा पेठ हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. गेल्या 28वर्षात 25वर्षे गिरीष बापट आमदार होते. त्यानंतर मुक्ता टिळक आमदार झाल्या.

कसबा मतदारसंघात प्रामुख्यानं येणाऱ्या भागांमध्ये शनिवार वाडा, सोमवार पेठचा काही भाग, नारायण पेठ, सदाशिव पेठ, दांडेकर पूल,मंडईची मुख्य बाजारपेठ, नवी पेठ आणि लोकमान्य नगरचा भाग येतो.

काँग्रेसमध्ये नाराजी

कसबा पेठेत काँग्रेसमध्ये रवींद्र धंगेकर यांचे नाव निश्चित झाल्याचे सांगण्यात येत होते. त्यांच्या कार्यालयासमोर शनिवारी फटाकेही फोडण्यात आले. परंतु काँग्रेसमध्ये धंगेकर यांच्या उमेदवारीवरुन नाराजी आहे. त्यास काही स्थानिक नेत्यांची फूस आहे.काँग्रेसच्या बाळासाहेब दाभेकर यांनी निष्ठावंतांना डावलून बाहेरच्या उमेदवारांना तिकीट दिल्यास बंडखोरी करणार असल्याचे आव्हान दिले. यामुळे काँग्रेसचा उमेदवार जाहीर होऊ शकला नाही.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.