Corona alert | वाढत्या कोरोना रुग्णसंख्येला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज; रुग्णालयात १५ हजार बेड सुज्ज
कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे ऑक्सीजनचा पुरवठा कमी पडू नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. सद्यस्थितीला जिल्ह्यात जवळपास 38 ऑक्सिजन निर्मितीचे प्लँट उभारण्यात आले आहेत. यातून रोज 11 हजार 89 लीटर पर मिनिट ऑक्सिजनची निर्मित केला जात आहे. जवळपास 3 हजार रुग्णांना 4 लीटर पर मिनिट दराने या ऑक्सिजनचा पुरवठा केला जाऊ शकतो.
पुणे – ओमिक्रॉन व कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनामुळे पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाली आहे. कुठल्याही परिस्थीतीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाला आहे. शहरातील रुग्णालयात 15 हजार 575 ऑक्सिजन खाटा, 3 हजार337 अतिदक्षता विभागातील खाटा तर 1 हजार 825 व्हेटीलेटर सज्ज ठेवण्यात आले आहे.
दुप्पटीने वाढतीय संख्या
गेल्या दोन आठवड्यापासून रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. गुरुवारी पुणे शहरात 298, पिंपरी चिंचवडमध्ये 80, नगर पालिका क्षेत्रात 10, कॅन्टोन्टमेंट परिसरात 20 तर ग्रामीण भागात 69असे एकुण जिल्ह्यात 477 रुग्ण आढळले. जिल्ह्यात एकुण 2 हजार 556 सक्रीय कोरोना बाधित रुग्ण आहेत. ही संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासन पुन्हा धास्तावले असून खबरदारीचा उपाय म्हणून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आहे. या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर 15 हजार 575 ऑक्सिजन खाटा तयार ठेवण्यात आल्या आहेत. त्याच बरोबर 3 हजार 337 अतिदक्षता विभागातील खाटा तर 1 हजार 825 व्हेंटिलेटर सज्ज ठेवण्यात आले आहेत.
ऑक्सिजन निर्मितीचे प्लँट कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे ऑक्सीजनचा पुरवठा कमी पडू नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. सद्यस्थितीला जिल्ह्यात जवळपास 38 ऑक्सिजन निर्मितीचे प्लँट उभारण्यात आले आहेत. यातून रोज 11 हजार 89 लीटर पर मिनिट ऑक्सिजनची निर्मित केला जात आहे. जवळपास ३ हजार रुग्णांना 4 लीटर पर मिनिट दराने या ऑक्सिजनचा पुरवठा केला जाऊ शकतो. या सोबतच 464. 7 मेट्रीक टन लिक्विड स्वरूपात ऑक्सीजन साठा करण्यात आला आहे. दुसऱ्या लाटेत360 मॅट्रीकटन ऑक्सिजनची मागणी होती. सध्याच्या घडीला दोन दिवस अतिरिक्त पुरवठा करता येईल येवढा साठा पुणे जिल्ह्यात उपलब्ध आहे.
महाविद्यालय पुन्हा ऑनलाईन? ओमिक्रॉन व कोरोनाच्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालये पुन्हा सुरु करायचे का? याबाबत चर्चा सुरु आहे. उच्च शिक्षणविभाग पुन्हा महाविद्यालये ऑनलाईन सुरु करण्याच्या विचाराधीन आहे. याबाबत येत्या २ जानेवारीला निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. याबाबत राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरुची बैठक पार पाडली आहे.
रेती तस्करी थांबवताना महिला सिंघम वनरक्षकावर जीवघेणा हल्ला, ट्रॅक्टरने चिरडण्याचा प्रयत्न