Gautami Patil | गौतमी पाटीलचं खरं आडनाव माहितीये का? पुण्यात चक्क आडनावावरून बैठक

गौतमी जिथे जाईल तिथे तिच्या कार्यक्रमाला प्रचंड प्रमाणात गर्दी होते. काही वेळा तर तिच्या कार्यक्रमात प्रेक्षकांना आवर घालण्यासाठी लाठीमारही करावा लागतो. यावरून गौतमीची क्रेझ किती प्रचंड आहे हे दिसून येतं.

Gautami Patil | गौतमी पाटीलचं खरं आडनाव माहितीये का? पुण्यात चक्क आडनावावरून बैठक
Gautami Patil Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 24, 2023 | 3:19 PM

पुणे : सबसे कातिल गौतमी पाटील… हा डायलॉग संपूर्ण महाराष्ट्रात गाजला आहे. गौतमी आणि गर्दी हे जणू आता समीकरणच झालं आहे. राज्यातील असा एक जिल्हा नसेल जिथे गौतमीचा कार्यक्रम होत नसेल. अगदी वाढदिवसानिमित्तही गौतमीला बोलावलं जातं. गौतमीच्या डान्सला आणि तिच्या कार्यक्रमांना विरोध होत असला तरी तिचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तिच्याविषयी छोट्यातली छोटी गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अशातच गौतमीच्या आडनावाविषयी नवी माहिती समोर आली आहे. गौतमीच्या आडनावावरून पुण्यात चक्क बैठक पार पडली आहे.

“गौतमीचं खरं आडनाव पाटील नसून चाबुकस्वार आहे. पाटील आडनाव लावून ती पाटलांची बदनामी करतेय. गौतमीनं पाटील हे आडनाव लावू नये. अन्यथा महाराष्ट्रात तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही,” असा इशारा मराठा समन्वयकचे राजेंद्र जराड पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे गौतमीच्या आडनावावरून नवा वाद निर्माण झाला आहे.

हे सुद्धा वाचा

एकेकाळी ऑर्केस्ट्रामध्ये अदाकारा म्हणून काम करणारी गौतमी आज सर्वांना मागे टाकून पुढे गेली आहे. एखाद्या अभिनेत्रीलाही नसेल अशी गौतमी पाटीलची क्रेझ महाराष्ट्रभर निर्माण झाली आहे. त्यामुळेच तिच्या कार्यक्रमांना संपूर्ण महाराष्ट्रातून मागणी होत आहे. कारण गौतमी पाटील आणि कार्यक्रम यशस्वी होणारच हे समीकरण झालं आहे. त्यामुळे गौतमी जिथे जाईल तिथे तिच्या कार्यक्रमाला प्रचंड प्रमाणात गर्दी होते. काही वेळा तर तिच्या कार्यक्रमात प्रेक्षकांना आवर घालण्यासाठी लाठीमारही करावा लागतो. यावरून गौतमीची क्रेझ किती प्रचंड आहे हे दिसून येतं.

सुरुवातीच्या काळात गौतमीच्या कार्यक्रमांवर विशेषत: तिच्या डान्सवर आक्षेप घेण्यात आला होता. गौतमी अश्लील अदा करत असल्याची टीका झाली होती. त्यावेळी तिने स्वत:हून माफीही मागितली होती. त्यानंतर तिने अश्लील हावभाव वाटणाऱ्या स्टेप्स करणं टाळण्यास सुरुवात केली. तरीही तिच्या कार्यक्रमांना होणारी गर्दी काही थांबली नाही आणि थांबताना दिसत नाही.

गौतमी सध्या एका कार्यक्रमाचे दीड ते 2 लाख रुपये मानधन घेते. तिचा दहा बारा जणांचा लवाजमा असतो. या सर्वांमध्ये मानधनाचं वाटप केल्यानंतरही गौतमी महिन्याला 30 ते 35 लाख रुपये सहज कमावते. एखाद्या सिनेमात काम करणाऱ्या नटीच्या तोडीस तोड गौतमीची कमाई आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गौतमीच्या कार्यक्रमांना ग्रामीण भागात अधिक डिमांड आहे. त्यातही तिने कोल्हापूर आणि पुण्यात सर्वाधिक कार्यक्रम केले आहेत. गौतमी खानदेशातील असूनही पुणे आणि कोल्हापुरात तिचा चाहता वर्ग अधिक आहे हे विशेष.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.