ससूनमधील आरामासाठी ललित पाटील किती पैसे देत होता? माहिती आली समोर

Lalit Patil | पुणे येथील ससून रुग्णालयातून उघड झालेल्या ड्रग्स प्रकरणात ललित पाटील यासंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. ससून रुग्णालयात ऐषआरामासाठी ललित पाटील लाखो रुपये महिन्याला मोजत होता. हे पैसे ललित पाटील कोणाला देत होता, त्याची माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे.

ससूनमधील आरामासाठी ललित पाटील किती पैसे देत होता? माहिती आली समोर
Lalit Patil
Follow us
| Updated on: Nov 10, 2023 | 9:49 AM

प्रदीप कापसे, पुणे | 10 नोव्हेंबर 2023 : नाशिक जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या ललित पाटील याला एका ड्रग्स प्रकरणात पुणे पोलिसांनी अटक केली होती. तीन वर्षांच्या येरवडा कारागृहातील काळात तो तब्बल नऊ महिने ससून रुग्णालयात राहिला. ससून रुग्णालयात ललित पाटील याला पंचतारांकीत सुविधा मिळत होती. त्याला मैत्रिणी भेटण्यासाठी येत होत्या. तो रुग्णालयातून हॉटेलमध्ये जात होता. हॉटेलमध्ये त्याची एक खोली नेहमी बुक असत होती. एका कैद्यास इतक्या सुविधा कशा मिळाल्या? हा प्रश्न सर्वांना पडला होता. अखेर या प्रश्नाचे उत्तर पोलिसांच्या तपासातून मिळाले आहे. या सर्व सुविधांसाठी ललित पाटील तब्बल 17 लाख रुपये महिन्याला देत होता. यामुळे त्याला यासर्व सुविधा मिळत होत्या.

कोणाला देत होता पैसे

ललित पाटील उपचाराच्या नावाखाली महिनेमहिने ससून रुग्णालयात राहत होता. त्यासंदर्भात राजकीय आरोप-प्रत्यारोप मोठ्या प्रमाणावर होत आहे. ललित पाटील सारखा ड्रग्स प्रकरणातील कैदी तीन वर्षांत रुग्णालयात उपचाराच्या नावाखाली आराम करत होता. हवे तसे कुठेही फिरत होता. रुग्णालयातून हॉटेलमध्ये जात होता. त्यासाठी ललित पाटील महिन्याला १७ लाख रुपये देत होता. पोलीस तपासात ललित पाटील याने ही माहिती दिली. १६ नंबर वार्डात ड्युटीवर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना तो पैसे देत होता. ही धक्कादायक माहिती तपासातून समोर आली आहे.

हे सुद्धा वाचा

इनोव्हा कारमधून फिरस्ती

ललित पाटील इनोव्हा कारमधून पुणे शहरात फिरत होता. कैदी असताना मॉलमध्ये जात होता. हवे ते खरेदी करत होता. बिर्याणीचे पार्सल घेण्यासाठी तो जात होता. यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी करणाऱ्या पोलिसांनाही धक्का बसला आहे. ललित पाटील याचे हे कारनामे उघड होत असल्यामुळे त्याला मदत करणारे पोलीस कर्मचारी अडचणीत येण्याची शक्यता आहे. या प्रकरणात दहा पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे निलंबन झाले आहे. परंतु बडतर्फीची कारवाई अजून कोणावर झाली नाही.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.