पैसे नव्हते…कार घेण्याचे होते स्वप्न…दहावी पास शेतकऱ्याने स्वत: बनवली कार

एखाद्या व्यक्तीने ठरवले तर काही करु शकतो. दहावी पास शेतकऱ्याने हे करुन दाखवले. शेतकऱ्यास एका एक विंटेज कार हवी होती. परंतु त्यासाठी पैसे नव्हते. इंजिनिअरींगचे कोणतेही प्रशिक्षण नसताना शेतकऱ्यांने स्वत: कार बनवली. आता हा विषय पुणे जिल्ह्याच चांगलाच चर्चेचा ठरला आहे.

पैसे नव्हते...कार घेण्याचे होते स्वप्न...दहावी पास शेतकऱ्याने स्वत: बनवली कार
रोहिदास नवघाने यांनी बनवलेली विंटेज कार
Follow us
| Updated on: Oct 27, 2023 | 2:39 PM

पुणे | 27 ऑक्टोंबर 2023 : प्रत्येक व्यक्तीचे काहीतरी स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो अनेक प्रयत्न करत असतो. पुणे जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने असेच स्वप्न पाहिले. कार घेण्याचे हे स्वप्न होते. परंतु घराची परिस्थिती कार घेण्यासारखी नव्हती. स्वत:चे कुटुंबही चालवणे त्यांना अवघड होते. घराची परिस्थिती अतीसामान्य असल्यामुळे विंटेज कार घेणे तर दूर साधी सायकल ते घेऊ शकत नव्हते. परंतु प्रयत्न केल्यानंतर अशक्य गोष्टी शक्य होतात. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील जांभुळवाडी येथील शेतकरी रोहिदास नवघाने यांनी हा प्रयोग यशस्वी केला आहे. आता त्यांच्या या अनोख्या कारची चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे.

अशी केली सुरुवात

शेतकरी रोहिदास नवघाने एकावेळेस दिल्लीत गेले होते. त्यावेळी त्यांनी ई-रिक्षा पाहिली. त्यानंतर त्यांनी ड्रिम विंटेज कार बनवण्याचे स्वप्न पाहिले. पैसे नव्हते आणि स्वप्न पूर्ण करायचे होते. त्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले. गावातील भंगाराच्या दुकानातून सामान विकत घेण्यास सुरुवात केली. त्याचवेळी कागदावर आपली कारचे डिजाइन उतरवण्यास प्रारंभ केला. रोहिदास नवघाने काही इंजिनिअर नव्हते. त्यांचे शिक्षण फक्त दहावीपर्यंत झालेले होते. परंतु त्यांनी आपला भाऊ, मुले आणि मित्रांच्या मदतीने कार बनवण्यास सुरुवात केली. अडीच महिन्यांत त्यांची ही विंटेज कार तयार झाली. त्यासाठी त्यांना केवळ अडीच लाख रुपये खर्च आला.

हे सुद्धा वाचा

बॅटरीवर चालते कार

लाल रंगाच्या या कारची चर्चा परिसरात चांगलीच झाली आहे. ही कार रस्त्यावरुन जात असताना लोक त्याचे फोटो घेतात. ही कार बॅटरीवर चालते. त्यात पाच बॅटरीचा वापर करण्यात आला आहे. ही कार एकदा चार्ज केल्यावर 100 किलोमीटरपर्यंत सहज चालू शकते. कार चार्ज करण्यासाठी पाच ते सहा तासांचा कालावधी लागतो. लोणावळातील कार्ला गडही या कारने पार केला आहे. रोहिदास नवघाने आपले लहानपणाचे स्वप्न पूर्ण झाल्यामुळे आनंदी आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतील ‘मेक इन इंडिया’ कार त्यांनी बनवली आहे.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.