Nitin Raut: ऊर्जामंत्री नितीन राऊत भीमा कोरेगाव शहिदांना मानवंदना देणार
भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी 1818 साली घडलेल्या ऐतिहासिक क्रांतिकारक घटनेमुळे दलित पीडित व शोषित घटकाला जातीय दास्यातून मुक्त करण्यासाठी प्रेरित केले असून सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीसाठी या घटनेला डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी खूप महत्वाचे म्हटले आहे.
पुणे : भीमा कोरेगाव शहिदांना मानवंदना अर्पण करण्यासाठी राज्याचे ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत हे 1 जानेवारी 2022 रोजी भीमा कोरेगाव येथे सकाळी 11.30 वाजता उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर 12 वा ते वढु बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळाला जाऊन अभिवादन करणार आहेत. सकाळी ते विजयस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी 1818 साली शहीद झालेल्या क्रांतिकारकांना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भीमा कोरेगाव घटनेला महत्वाचे म्हटले
भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी 1818 साली घडलेल्या ऐतिहासिक क्रांतिकारक घटनेमुळे दलित पीडित व शोषित घटकाला जातीय दास्यातून मुक्त करण्यासाठी प्रेरित केले असून सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीसाठी या घटनेला डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी खूप महत्वाचे म्हटले आहे. पेशवाईत मनुस्मृतीच्या आधारे दलितांवर कमालीचे अत्याचार केले जात होते. त्यांना गुलामांपेक्षा, जनावरांपेक्षाही वाईट वागवले जात होते. म्हणूनच ब्रिटिश सैन्यात असलेल्या अवघे 800 मराठे व महार सैन्याने 1 जानेवारी 1818 रोजी भीमा कोरेगाव येथे दुसरे बाजीराव पेशवे यांच्या बलाढ्य सैन्याचा पराभव करून पेशवाईच्या गुलामगिरीतून बहुजन समाजाला मुक्त केले होते. म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर यांनी या घटनेला महत्व दिले.
भीमा कोरेगावचा इतिहास काय आहे?
पुण्यापासून 20 किमी अंतरावर असलेल्या कोरेगावात 1 जानेवारी 1818 रोजी इंग्रज आणि पेशव्यांमध्ये युद्ध झाले होते. पेशव्यांच्या जाचाला कंटाळून पेशवाई नष्ट करण्याच्या हेतूने महार समाजातील लोक मोठ्या संख्येने इंग्रज सैन्यात भरती झाले, असे इतिहासकारांचे म्हणणे आहे. युद्धाच्या वेळी पेशव्यांच्या सैन्याची संख्या काही हजारांमध्ये होती तर इंग्रजांचे सैन्य हजाराच्या आत होते. तरीही महार रेजिमेंटने 16 तासांत पेशव्यांचा पराभव केला होता. त्यानंतर महार समाजातील सैनिकांनी 1 जानेवारी 1818 रोजी सायंकाळी आपला विजय घोषित केला. अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या सैनिकांनी या लढाईत आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ आणि शौर्याचे प्रतीक म्हणून ब्रिटिशांनी भीमा नदीच्या तीरावर कोरेगावमध्ये भव्य क्रांतिस्तंभ उभारला. (Energy Minister Nitin Raut Bhima will pay homage to Koregaon martyrs)
इतर बातम्या