शेतकऱ्यांची कृतज्ञता, पुण्यात बैलाच्या मृत्यूनंतर माणसाप्रमाणे दशक्रिया विधी तेरावा
पुण्याजवळील खेड तालुक्यातील रेटवडी गावात काळे कुटुंबीयांनी 22 वर्षांपासून सोबत असलेल्या आपल्या 'नंद्या' नावाच्या बैलाबद्दल अनोखी कृतज्ञता व्यक्त केलीय. काही दिवसांपूर्वी या बैलाचे निधन झाले.
पुणे : पुण्याजवळील खेड तालुक्यातील रेटवडी गावात काळे कुटुंबीयांनी 22 वर्षांपासून सोबत असलेल्या आपल्या ‘नंद्या’ नावाच्या बैलाबद्दल अनोखी कृतज्ञता व्यक्त केलीय. काही दिवसांपूर्वी या बैलाचे निधन झाले. गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या सोबत असलेल्या बैला प्रति कृतज्ञात व्यक्त करत या शेतकऱ्यानं नंद्या बैलाच्या मृत्युनंतर माणसाप्रमाणे दशक्रिया विधी केला. तसेच तेरावा विधी गावकरी नातेवाईकांच्या उपस्थित केलाय.
4 महिन्याचं वासरु ते 22 वर्षांचा सहवासाचा प्रवास
कोरोना महामारीच्या संकट काळात माणसांचे अंत्यविधीही झाले नाहीत तर रक्ताच्या नात्यांनीही मृतदेह घेण्यास टाळाटाळ केली. मात्र, कष्टकऱ्याने बैलाची कृतज्ञता व्यक्त करत आयुष्यभराची साथ देणाऱ्या बैलाचा शेवट गोड केलाय. 4 महिन्याचे वासरु ते 22 वर्षांचा सहवासात नंद्या बैलाने काळे कुटुंबाच्या सदस्य बनला.
गोडधोड जेवणाची पंगत घालत तेराव्याचा धार्मिक कार्यक्रम
आता नंद्या बैल काळे कुटुंबाला सोडून गेलाय. या नंद्याची कृतज्ञता व्यक्त करत ज्या प्रमाणे माणूसाचा मृत्यू झाल्यानंतर ज्या पद्धतीने सेवा विधी पार पाडतात त्याच प्रमाणे नंद्या बैलाच्या मृत्यूनंतर विधी पार पाडण्यात आला. गावासह नातेवाईकांना गोडधोड जेवणाची पंगत घालत तेराव्याचा धार्मिक कार्यक्रम पार पडला.
गोठ्यातील बैलाची जागा रिकामीच
शिवराम काळे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. 22 वर्ष काळे कुटुंबासोबत नंद्या ने काबाड कष्ठ केले मात्र आज बैलांच्या गोठ्यातील या बैलाची जागा रिकामीच आहे. आज नंद्या बैलाच्या जाण्याने जेवढं दुख माणसांना झालं त्यापेक्षाही अधिक दुख त्याच्या सहकारी बैलांना झालं. एकीकडे राज्यात बैलगाडा शर्यत बंदी आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग आक्रमक झालाय. बैलगाडा शर्यत सुरू व्हावी यासाठी मोठी आंदोलने पेटली आहेत. असं असताना सुद्धा बळीराजा आपल्या बैलाला पोटच्या मुलासारखा संभाळ करताना पाहायला मिळत आहे.
हेही वाचा :
हाडाच्या शेतकऱ्याचं बैलावर जीवापाड प्रेम, बैलाच्या मृत्यूनंतर दशक्रियाविधी, बैलाचा पुतळाही उभारला!
शेतकऱ्यांवर नवं संकट, पालघरमध्ये गाई-बैलांसह जनावरांना ‘या’ रोगाची लागण, शेती कामं रखडली
पुराच्या पाण्यातून बैलगाडी हाकणं जीवावर, दोन्ही बैलांपाठोपाठ शेतकऱ्याचाही मृतदेह आढळला
व्हिडीओ पाहा :
Farmer did last rituals of Bull same as human being in Pune