EXCLUSIVE | पुणे शहराला हादरवणारी घटना, केमिकल कंपनीत स्फोट, नंतर भीषण अग्नितांडव
पुणे शहर एका आगीच्या भीषण घटनेमुळे हादरलं आहे. एका केमिकल कंपनीत मोठा स्फोट झालाय. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या दाखल झाल्या आहेत.
पुणे : महाराष्ट्राचं सांस्कृतिक शहर अशी ख्याती असलेल्या पुणे शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यात एका केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची माहिती मिळत आहे. या कंपनित अचानक मोठा स्फोट झाला. त्यानंतर एकच खळबळ उडाली. या स्फोटानंतर कंपनीला आग लागली, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. आगीच्या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहर हादरलं आहे. कंपनीत स्फोटानंतर निर्माण झालेल्या आगीमुळे परिसरात धुराचे साम्राज्य पसरलं आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. संबंधित आगीची घटनेची माहिती आता संपूर्ण शहरात पसरत आहे.
धायरी, गणेश नगर, गल्ली क्रमांक 22 येथे एका कारखान्याला भीषण आग लागल्याची माहिती मिळत आहे. संबंधित आगीच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पुणे पोलीस दाखल झाले. पोलिसांकडून परिसरातील गर्दी दूर सारण्याचे काम करण्यात आले. कारखान्यात अडकलेल्यांना बाहेर काढण्याचं काम तातडीने सुरु करण्यात आलं. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, पुणे आणि पीएमआरडीए अग्निशमन दलाकडून आठ वाहने घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत.
(सविस्तर बातमी लवकरच)…