Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Crime | पुणे शहरात थरार, सराफावर सहा गोळ्या झाडून दागिने लुटले

Pune Crime News | पुणे शहरात दिवाळी सणाचा उत्सवाची तयारी सुरु असताना गुन्हेगारी वाढली आहे. दोन दिवसांपूर्वी कोयता गँगने धुमाकूळ घातली होती. आता त्यानंतर भररस्त्यात सराफावर सहा गोळ्या झाडण्यात आल्या. हल्लेखोरांनी गोळीबार करुन त्यांच्याकडील दागिने लुटून नेले. या घटनेमुळे पुणे शहरातील गुन्हेगारीवर चिंता व्यक्त होऊ लागली आहे.

Pune Crime | पुणे शहरात थरार, सराफावर सहा गोळ्या झाडून दागिने लुटले
गोळीबार झालेल्या घटनास्थळाची पाहणी करताना पुणे पोलीस
Follow us
| Updated on: Nov 09, 2023 | 6:44 AM

पुणे | 9 नोव्हेंबर 2023 : पुणे शहरातील गुन्हेगारीचा विषय अधूनमधून चर्चेत येत असतो. पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ सुरु असतो. पुणे पोलिसांनी कोयता गँगच्या मुसक्या आवरण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी कोयता गँगने धुमाकूळ घातला. आता बुधवारी रात्री दुकान बंद करुन घरी जाणाऱ्या सराफावर भररस्त्यात गोळीबार करण्यात आला. गोळीबाराच्या या घटनेत सराफ व्यावसायिक प्रतिक मदनलाल ओसवाल( वय 35) गंभीर जखमी झाले आहेत. हल्लेखोरांनी त्यांच्यावर सहा गोळ्या झाळत त्यांच्याकडून सोने चांदीची बॅग पळवून नेली. त्यानंतर आरोपी फरार झाले. या घटनेमुळे पुणे शहर हादरले आहे.

कशी घडली घटना

प्रतिक मदनलाल ओसवाल यांची सराफ पेढी हडपसरमधील सय्यदनगर भागत आहे. बुधवारी रात्री ९.३० च्या सुमारास दुकान बंद करुन ते वडिलांसोबत दुचाकीवरुन घरी निघाले होते. त्यावेळी बी.टी.कवडे रस्त्यावर असताना दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी त्यांना रोखले. काही कळण्याच्या आता त्यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या. त्यातील तीन गोळ्या त्यांना लागल्या. त्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्याकडे दागिने असलेली बॅग पळवून नेले. ओसवाल यांच्या मांडीवर आणि गालावर गोळी लागल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालायत दाखल करण्यात आले.

हे सुद्धा वाचा

हल्लेखारांनी ठेवली पाळत

ऐन दिवाळीच्या तोंडावर पुण्यातील प्रसिद्ध सराफा व्यावसायिकावर गोळीबार झाल्यामुळे पुणे शहर हादरले आहे. गोळीबार करून हल्लेखोरांनी कोट्यावधी रुपयांचे सोने लुटले आहे. हल्लेखोरांनी पाळत ठेऊन हा प्रकार केला आहे. घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत. ओसवाल यांच्याकडे किती सोने होते, त्याची माहिती अजून मिळू शकली नाही. परंतु दिवाळीमुळे मोठ्या प्रमाणावर दुकानात सोने आणून ठेवले होते. या घटनेमुळे पुणे शहरात खळबळ उडाली असून गुन्हेगारीचा विषय चव्हाट्यावर आला आहे.

मंगळवारी सकाळी मंचरमध्ये सराफ दुकान फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. नागरिकांच्या सतर्कतेमुळे दारोडेखोरांचा हा प्रयत्न फसला. या प्रकरणात पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. दोन जण फरार झाले आहे.

ज्वेलर्सचं दुकान लुटायला आले आणि अडकले, नागरिकांनी आवळल्या ५ दरोडेखोरांच्या मुसक्या

खोक्या भाईसह धसांनाही सहआरोपी करा, अजय मुंडेंची मागणी
खोक्या भाईसह धसांनाही सहआरोपी करा, अजय मुंडेंची मागणी.
धमकीच्या ऑडिओ क्लिपमधला आवाज माझाच - संदीप क्षीरसागर
धमकीच्या ऑडिओ क्लिपमधला आवाज माझाच - संदीप क्षीरसागर.
रात्री 10 ते पहाटे 6 पर्यंत सर्व धार्मिक स्थळांवरील भोंगे बंद ठेवा..
रात्री 10 ते पहाटे 6 पर्यंत सर्व धार्मिक स्थळांवरील भोंगे बंद ठेवा...
शिंदेंच्या काळातल्या योजनांना कात्री? अर्थसंकल्पात निधीची तरतूद नाही
शिंदेंच्या काळातल्या योजनांना कात्री? अर्थसंकल्पात निधीची तरतूद नाही.
न्यायदान कक्षातच रंगतात ओल्या पार्ट्या, Video व्हायरल
न्यायदान कक्षातच रंगतात ओल्या पार्ट्या, Video व्हायरल.
बीड प्रकरणात सरकारला काय रस आहे माहीत नाही - भास्कर जाधव
बीड प्रकरणात सरकारला काय रस आहे माहीत नाही - भास्कर जाधव.
धंगेकरांच्या पक्षप्रवेशावर संजय राऊत यांचा खळबळजनक दावा
धंगेकरांच्या पक्षप्रवेशावर संजय राऊत यांचा खळबळजनक दावा.
निधी वाटपात भेदभाव? शिंदेंच्या मंत्र्यांना मिळाला सर्वात कमी निधी
निधी वाटपात भेदभाव? शिंदेंच्या मंत्र्यांना मिळाला सर्वात कमी निधी.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं.
देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात आरोपीच्या मित्रांना पोलिसांनी का घेतलं
देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात आरोपीच्या मित्रांना पोलिसांनी का घेतलं.