PCMC Election |पिंपरीत भाजपाला पहिला धक्का ; भाजप नगरसेवक वसंत बोराटे यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

भाजप नगरसेवक वसंत बोराटे यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात केला प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला आहे. वसंत बोराटे हे 2017 साली मोशी भागातून भाजपचे नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका अतिरिक्त आयुक्तांकडे आपला राजीनामा दिला होता.

PCMC Election |पिंपरीत भाजपाला पहिला धक्का ; भाजप नगरसेवक वसंत बोराटे यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
BJP vasant borate'
Follow us
| Updated on: Feb 17, 2022 | 12:57 PM

पिंपरी – आगामी महानगरपालिका निवडणुका लक्षात घेत सर्वचा राजकीयपक्ष सक्रिय झाले आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपला पहिला धक्का बसला आहे. भाजप नगरसेवक वसंत बोराटे(BJP corporator Vasant Borate) यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (Nationalist Congress Party)केला प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार(Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला आहे. वसंत बोराटे हे 2017 साली मोशी भागातून भाजपचे नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. स्थानिक नेत्यावर नाराज होते नगरसेवक वसंत बोराटे,नगरसेवकानी कामे करायची आणि त्याचे श्रये वरिष्ठांनी घ्याच अशा पध्दतीला कंटाळून दिला राजीनामा काल त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका अतिरिक्त आयुक्तांकडे आपला राजीनामा दिला होता.

श्रेय वरिष्ठांनी घ्यायचे

मोशीत ग्रीन झोन आहे. त्यामुळे विकास रखडला आहे. अनधिकृत बांधकामे होत आहेत. त्यामुळे ग्रीन झोनचे रहिवाशी झोनमध्ये रूपांतर करण्याची पाच वर्षात वारंवार मागणी केली. पण, त्याला कोणी दाद दिली नाही. विकास कामे करण्यासाठी स्वातंत्र्य नाही. नगरसेवकांनी काम करायचे आणि त्याचे श्रेय वरिष्ठांनी घ्यायचे अशी पद्धत आहे.

भाजप नेत्यांकडून सहकार्य नाही प्रशासकीय ताकद मिळाली नाही विविध आरक्षणे ताब्यात घेण्यासाठी शेवटपर्यंत प्रशासकीय ताकद मिळाली नाही. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य केले नाही. जाधववाडी आणि मोशीतील ग्रीन झोन हे रहिवासी झोन होणे आवश्यक होते. तेही झाले नाही. नदी सुधार प्रकल्पात नदीच्या बाजूचा परिसर विकसित होऊ शकला नाही परिणामी विकास कामांना गती मिळाली नाही. जनतेच्या दृष्टीने अपेक्षित कामे होऊ शकली नाहीत . मोशी, जाधववाडी भागातील लोक मोठ्या प्रमाणात महापालिकेला कर देतात. त्याप्रमाणात या भागातील नागरिकांना न्याय मिळाला नाही असा आरोपही त्यांनी केला आहे.

सोलापूर दूध संघ निवडणुकीत राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांच्या सूनबाई विरोधी पॅनेलकडून लढणार, सत्ताधाऱ्यांमध्ये नाराजी

मटण म्हणलं की तोंडाला पाणी सुटलंच समजा, पण उस्मानाबादी मटण म्हणजे… आss..हाss..हाss..!

औरंगाबादेत आणखी एक थाप, महिलेच्या हातानं गुप्तदान करायचं म्हणून लुटलं, काय घडली घटना?

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.