घरात लग्न होते, कार्यक्रम आटोपवल्यावर दोन कुटुंब लोणावळ्यात आले अन् पाच जण वाहून गेल्यावर कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Lonavala Bhushi Dam:अन्सारी आणि खान कुटुंबियांकडे २७ जून रोजी लग्न होते. त्यानंतर दोन दिवसानंतर वलिमाचा (लग्नानंतर रिसेप्शनचा कार्यक्रम) कार्यक्रम होतो. तो कार्यक्रम २९ तारखेला झाला. त्यामुळे लग्नाचा थकवा घालवण्यासाठी ३० तारखेला या कुटुंबियाने लोणावळ्यात जाण्याचा निर्णय घेतला.

घरात लग्न होते, कार्यक्रम आटोपवल्यावर दोन कुटुंब लोणावळ्यात आले अन् पाच जण वाहून गेल्यावर कुटुंबावर दु:खाचा डोंगर
लोणावळा धबधबा अपघात
Follow us
| Updated on: Jul 01, 2024 | 11:24 AM

Lonavala Bhushi Dam: पुणे शहरातील अन्सारी आणि खान कुटुंब लोणावळ्यात वर्षाविहारासाठी आले होते. चार दिवसांपूर्वीच या कुटुंबाकडे लग्न होते. घरात सर्व आनंदाचे वातावरण होते. त्यामुळे लग्नाचा थकवा घालवण्यासाठी लोणावळ्यात जाण्याचा निर्णय या कुटुंबाने घेतला. भुशी डॅम्पच्या ठिकाणी वर्षाविहारचा आनंद ते घेत होते. परंतु पुढे काळाने त्यांच्यासमोर काय लिहिले आहे? हे त्यांनाही माहीत नव्हते. एका दिवसात घरातील आनंदाच्या वातावरणाचा रुपांतर दु:खात झाले. कुटुंबातील पाच जण सर्वांना सोडून गेले. नेमके काय घडले, हे त्यांच्या नातेवाईकांनी ‘टीव्ही ९ मराठी’ला सांगितले.

काय आणि कसे घडले

अन्सारी आणि खान कुटुंबियांकडे २७ जून रोजी लग्न होते. त्यानंतर दोन दिवसानंतर वलिमाचा (लग्नानंतर रिसेप्शनचा कार्यक्रम) कार्यक्रम होतो. तो कार्यक्रम २९ तारखेला झाला. त्यामुळे लग्नाचा थकवा घालवण्यासाठी ३० तारखेला या कुटुंबियाने लोणावळ्यात जाण्याचा निर्णय घेतला. सकाळीच ते एका टेम्पो ट्रॅव्हलने निघाले. लोणावळ्यात १२ वाजता पोहचले. एकूण १७ जण लोणावळ्यात आले होते, असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. त्यानंतर दुपारी दोन वाजता भावाचा फोन आला. तो प्रचंड घाबरलेला होता. त्याची मुलगी वाहून गेली. त्याच्या फोननंतर मी तातडीने निघालो आणि लोणावळ्यात आलो. अनिद अन्सारी यांच्या भावाने ‘टीव्ही ९ मराठी’ला सांगितले.

काय घडली होती घटना

पुण्यातील लोणावळ्यामध्ये एकाच कुटुंबातील पाच जण धबधब्यात वाहून गेल्याची घटना रविवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली होती. वाहून गेलेल्यामध्ये चार जणांचे मृतदेह सापडले आहे. त्यातील एक मृतदेह शोधण्याचे काम अजूनही सुरुच आहे. साहिस्ता लियाकत अन्सारी (वय- 36), अमिमा सलमान उर्फ आदिल अन्सारी (वय- 13), उमेरा सलमान उर्फ आदिल अन्सारी (वय- 8) अदनान अन्सारी (वय- 4), मारिया अन्सारी (वय- 9) हे पाच जण वाहून गेले आहेत.

हे सुद्धा वाचा

जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे आणि मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख, प्रांत सुरेंद्र नवले, नायब तहसीलदार गणेश तळेकर, लोणावळा मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

सदाभाऊंनी मारकडवाडी गाजवली, शरद पवार-गांधींची मिमिक्री अन् हस्यकल्लोळ
सदाभाऊंनी मारकडवाडी गाजवली, शरद पवार-गांधींची मिमिक्री अन् हस्यकल्लोळ.
'वर्षभराच्या आत....', राम सातपुतेंचा मोहिते पाटलांना थेट इशारा
'वर्षभराच्या आत....', राम सातपुतेंचा मोहिते पाटलांना थेट इशारा.
महिला सरपंचाच्या पतीचा खून की..? मृतदेह आढळल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ
महिला सरपंचाच्या पतीचा खून की..? मृतदेह आढळल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ.
कुर्ला बस अपघातप्रकरणी फडणवीसांकडून 5 लाखांची मदत; म्हणाले, दुःखात..
कुर्ला बस अपघातप्रकरणी फडणवीसांकडून 5 लाखांची मदत; म्हणाले, दुःखात...
कुर्ल्यात बस ड्रायव्हर मद्यधुंद की ब्रेक फेल? संतप्त जमावानं बेदम धुतल
कुर्ल्यात बस ड्रायव्हर मद्यधुंद की ब्रेक फेल? संतप्त जमावानं बेदम धुतल.
एकनाथ शिंदे अडूनच... गृहखात्यासाठी शिंदे-फडणवीस यांच्यात रस्सीखेच
एकनाथ शिंदे अडूनच... गृहखात्यासाठी शिंदे-फडणवीस यांच्यात रस्सीखेच.
'योग्य वेळी योग्य निर्णय...', जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय?
'योग्य वेळी योग्य निर्णय...', जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय?.
कोणत्या लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार?आदिती तटकरेंनी क्लिअर सांगितले
कोणत्या लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार?आदिती तटकरेंनी क्लिअर सांगितले.
मारकडवाडीचा मुद्दा दिल्लीपर्यंत अन् विधानसभेतही रंगले सवाल-जवाब
मारकडवाडीचा मुद्दा दिल्लीपर्यंत अन् विधानसभेतही रंगले सवाल-जवाब.
Kurla Accident : ज्या बसने झाला जीवघेणा अपघात, त्या बसची अवस्था काय ?
Kurla Accident : ज्या बसने झाला जीवघेणा अपघात, त्या बसची अवस्था काय ?.