व्हॉट्सॲपवर झालेल्या ओळखीने दिला लाखो रुपयांचा फटका, काय आहे हा फसवणुकीचा फंडा

व्हॉट्सॲप व सोशल मीडिया फसवणुकीचे नवीन माध्यम झाले आहे. पुणे जिल्ह्यात व्हॉट्सॲपवरील चॅटींगमधून एकाची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. त्यातून त्याने विश्वास संपादन केला. मग त्याने फसवणुकीला सुरुवात केली. परंतु फसवले गेल्याचे समजले तेव्हा खूप उशीर झाला होता.

व्हॉट्सॲपवर झालेल्या ओळखीने दिला लाखो रुपयांचा फटका, काय आहे हा फसवणुकीचा फंडा
नाशिकमध्ये हल्ल्यात मॅनेजरचा मृत्यूImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 26, 2023 | 12:49 PM

पुणे : आपण सोशल मीडियाच्या जगात वावरु लागलो आहोत. यामुळे या अभासी जगामुळे एकमेकांची ओळख होते. परंतु जेव्हा प्रत्यक्ष भेट होते, तेव्हा आपण लागलीच विश्वास ठेवतो. परंतु सोशल मीडियातून झालेली ही ओळख घातक ठरु शकते. कारण अनेक खोटी आश्वासने देऊन तुमचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला जातो. पुणे जिल्ह्यातून असाच फसवणुकीचा मोठा प्रकार उघड झाला आहे. ही फसवणूक तब्बल 38 लाख 48 हजार रुपयांची आहे. जेव्हा त्या व्यक्तीने पैसे मागितले तेव्हा जीवे मारण्याची धमकी दिली गेली. आता हे प्रकरण पोलिसात गेले आहे.

काय आहे प्रकार

पुणे जिल्ह्यातील चिखली येथील महिलीचे समीर शाहीर पटेल याच्याशी व्हॉट्सॲपवरील चॅटींगमधून ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. त्यातून शाहीर याने विश्वास संपादन केला. मग त्याने फसवणुकीला सुरुवात केली. कॅन्सरवरील उपचारसाठी व नोकरीसाठी पैशांची आवश्यकता असल्याचे सांगून 38 लाख 48 हजार 609 रुपयांची फसवणूक केली. फिर्यादीने पैसे परत मागितले तर आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना एप्रिल 2020 ते 24 मार्च 2023 या कालावधीत चिखली येथील शरदनगरमध्ये घडली. या प्रकरणी 45 वर्षीय महिलेने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी समीरविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हे सुद्धा वाचा

या प्रकरणी पोलिसांनी समीर याचा शोध सुरु केला आहे. अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेऊन व्यवहार करु नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

फसवणुक कशी टाळावी?

अनोळखी व्यक्तींसोबत कोणतेही आर्थिक व्यवहार करताना सावध राहा. अनोळखी मेसेज पाठवणाऱ्यांचे नंबर्स ब्लॉक करा आणि रिपोर्ट करा. सायबर गुन्ह्यांत फसवणूक झाली असेल तर http://www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर तक्रार दाखल करा.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.