Pune News : पुणे शहरात बसमधून करा मोफत प्रवास, काय आहे योजना?

Pune News : पुणे शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणाऱ्या प्रवाशांसाठी चांगली बातमी आहे. या प्रवाशांना बसमधून मोफत प्रवास करता येणार आहे. त्यासाठी त्यांना फक्त एक काम करावे लागणार आहे. दोन्ही महानगरपालिकाने ही योजना मंजूर केली आहे.

Pune News : पुणे शहरात बसमधून करा मोफत प्रवास, काय आहे योजना?
PMPML
Follow us
| Updated on: Aug 31, 2023 | 8:47 AM

पुणे | 31 ऑगस्ट 2023 : पुणे शहर देशातील टॉप १० मध्ये असलेले शहर आहे. या शहरातील नागरिकांसाठी अनेक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. राज्य आणि केंद्र सरकारने पुणे शहराला मेट्रोची भेट दिली. पुणे शहरातील नागरिकांनी या मेट्रोला चांगलाच प्रतिसाद दिला. यामुळे आता मेट्रोचा विस्तार आणखी वाढणार आहे. त्याचवेळी बस प्रवास अधिक चांगला करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) आणि पुणे तसेच पिंपरी चिंचवड मनपाकडून निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे बसमधील प्रवास मोफत होणार आहे.

काय आहे योजना

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी पीएमपीएमएलकडून मोफत प्रवासाची योजना आणली आहे. मेट्रोचे तिकीट दाखवल्यानंतर प्रवाशांना पीएमपीएलमधून मोफत बस प्रवास करता येणार आहे. पीएमपीएलच्या इलेक्ट्रिक बसच्या माध्यमातून प्रवाशांना ही सुविधा देण्यात येणार आहे. मेट्रो स्टेशनच्या 3 ते 4 किलोमीटरच्या परिसरात मोफत बस सेवा देण्यात येणार आहे. पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी ही माहिती दिली.

आणखी बस खरेदी करणार

पुणे शहरातील सुमारे दोन लाख पुणेकर पीएमपीएमएल बसमधून प्रवास करतात. ‘पीएमपीएमएल’कडे असणाऱ्या सध्याच्या बसेसपैकी काही बसचे आयुष्य संपलेले आहे. त्यासाठी नवीन बसेस घेण्यात येणार आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरासाठी ६५० बस टप्पाटप्याने घेण्यात येणार आहेत. त्यातून ऑगस्ट महिन्यात १९२ बसेस दाखल येत आहे. मेट्रोचा प्रवास करणाऱ्या नागरिकांना बस सेवा मोफत देण्यासाठी या बसेसचा वापर होणार आहे. त्यासाठी पीएमपीएल नव्याने 300 इलेक्ट्रिक बस खरेदी करणार आहे.

हे सुद्धा वाचा

दोन्ही मनपाकडून मंजुरी

पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून नवीन बसेस सुरु करण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे. यामुळे मोफत बसप्रवास प्रवाशांचा लवकरच सुरु होणार आहे. परंतु ही सेवा नेमकी कधी सुरु होणार आहे? त्यासंदर्भात तारीख जाहीर केली गेली नाही. या योजनेसाठी मेट्रो स्टेशनला तीन ते चार बस दिल्या जाणार आहेत. या बस संबंधित स्टेशनच्या परिसरात निश्चित केलेल्या मार्गांवरून जाता येणार आहे. मेट्रोचे तिकिट नसणाऱ्या प्रवाशांना या बसमधून प्रवास करता येईल. परंतु त्यांना तिकिटाचे पैसे द्यावे लागतील.

‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.