गणेशोत्सवात कधीपासून कधीपर्यंत लाऊडस्पीकर वाजणार, पोलिसांनी दिली माहिती

ganesh utsav 2024: पुणे शहरात यंदा 3798 सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. घरगुती गणपतीची संख्या 6,64,257 इतकी आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 1742 लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. लेझर लाईटला बंदी असणार आहे.

गणेशोत्सवात कधीपासून कधीपर्यंत लाऊडस्पीकर वाजणार, पोलिसांनी दिली माहिती
ganesh utsav 2024
Follow us
| Updated on: Sep 06, 2024 | 3:45 PM

राज्यभरात उद्या शनिवारी गणरायाचे आगमन होणार आहे. दहा दिवस गणेश भक्तांना भव्य दिव्य देखावे पाहण्यास मिळणार आहे. या काळात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार ध्वनीक्षेपक वापरण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी कधीपासून कधीपर्यंत लाऊडस्पीकर वाजवता येणार आहे, त्याची माहिती दिली. गणेशोत्सव काळात 7 ते 12 सप्टेंबरपर्यंत रात्री 10 पर्यन्त लाऊडस्पीकर वापरता येणार आहे. त्यानंतर 13 ते 17 पर्यंत म्हणजे पाच दिवस रात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकर सुरु ठेवण्यास परवानगी असणार आहे, असे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला सांगितले.

तीन दिवस दारुबंदी

गणेशोत्सव काळात सात हजार पोलिसांचा शहरात बंदोबस्त असणार आहे. गणेशोत्सव काळात 7, 16 आणि 17 सप्टेंबरला तीन दिवस शहरात दारू बंदी असणार आहे. पुण्यातील फरासखाना, विश्रामबाग आणि खडक भागात 10 दिवस दारू बंदी करण्याचा प्रस्ताव सरकारकडे देण्यात आला आहे.

756 आरोपीना प्रतिबंधात्मक नोटीसा

गणेशोत्सव काळात 756 आरोपीना प्रतिबंधात्मक नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. कोयता मिळणाऱ्या ठिकाणाचा शोध घेऊन त्यावर कारवाई करण्यात येणार आहे. अल्पवयीन आरोपींबाबत वेगळा विचार करत असल्याचे अमितेश कुमार यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

पुणे शहरात यंदा 3798 सार्वजनिक गणेश मंडळे

पुणे शहरात यंदा 3798 सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. घरगुती गणपतीची संख्या 6,64,257 इतकी आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 1742 लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. लेझर लाईटला बंदी असणार आहे. 10 क्युआरटी टीम्स तैनात असणार आहेत. सोशल मीडियावर काही आपत्तीजन्य पोस्ट टाकल्यास कारवाई केली जाणार आहे.

शहरात जर काही गँग ऍक्टिव्ह झाल्या असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहेत. मागच्या आठवड्यात काही घटना घडल्या आहेत, त्याबाबत पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. ‘इट का जबाब पथर से’ देण्याची क्षमता पुणे पोलिसांची आहे. पोर्षे कर अपघात प्रकरणात पुणे पोलिसांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. मात्र, या घटनेत केलेल्या कारवाईमुळे आरोपीला अद्याप जामीन मिळाला नाही. गुन्हेगारी पूर्णपणे नेस्तेनाबूत करण्यासाठी पोलीस योजना तयार करत आहेत, ते तुम्हाला हळू हळू दिसणार आहे, असे पोलिसांनी सांगितले.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.