रेमडेसिवीरच्या नावाने पॅरासिटामोलच्या गोळ्यांचे पाणी, 35 हजारांना बनावट इंजेक्शची विक्री, बारामतीत टोळीचा पर्दाफाश

बारामती तालुका पोलिसांनी बनावट रेमडेसिवीर तयार करून त्याची चढ्या दराने विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय (Gang selling fake remdisivir injection arrested by Baramati Police).

रेमडेसिवीरच्या नावाने पॅरासिटामोलच्या गोळ्यांचे पाणी, 35 हजारांना बनावट इंजेक्शची विक्री, बारामतीत टोळीचा पर्दाफाश
Remdesivir injection
Follow us
| Updated on: Apr 17, 2021 | 4:55 PM

बारामती (पुणे) : देशभरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत असल्याने रुग्णांसह नातेवाईकांची प्रचंड ताणाताण होवू लागलीय. त्यातच आता बारामती तालुका पोलिसांनी बनावट रेमडेसिवीर तयार करून त्याची चढ्या दराने विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय. रेमडेसिवीरच्या रिकाम्या बाटलीत पॅरासिटामोलच्या गोळ्यांचे द्रावण भरून एक इंजेक्शन 35 हजार रुपयांना विक्री करून मालामाल होण्याच्या या टोळीचा डाव पोलिसांच्या कारवाईमुळे फसलाय (Gang selling fake remdisivir injection arrested by Baramati Police).

संबंधित प्रकार उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास

देशासह राज्यात सध्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झालाय. या पार्श्वभूमीवर बनावट इंजेक्शनची विक्री होत असल्याची बाब उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आली होती. त्यांनी याबाबत तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार बारामती तालुका पोलिसांना काहीजण या इंजेक्शनची विक्री करत असल्याची माहिती मिळाली (Gang selling fake remdisivir injection arrested by Baramati Police).

पोलिसांकडून चौघांना अटक

पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश विधाते, पोलीस हवालदार राजेंद्र जाधव, पोलीस नाईक रमेश भोसले, दीपक दराडे, निखिल जाधव यांच्या पथकाने सापळा रचत पोलिसांनी बारामती शहरातील फलटण चौकात दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून आणखी माहिती घेतल्यास चौघांची टोळी या कामात सक्रिय असल्याची बाब समोर आलीय.

आरोपींकडून गुन्ह्याची कबुली

इंजेक्शन विक्रीसाठी आलेल्या प्रशांत सिद्धेश्वर घरत (रा. भवानीनगर, ता. इंदापूर) आणि शंकर दादा भिसे (रा. काटेवाडी, ता. बारामती) या दोघांनी मुख्य सूत्रधार दिलीप ज्ञानदेव गायकवाड (रा. काटेवाडी, ता. बारामती) आणि संदीप संजय गायकवाड (रा. भिगवण, ता. इंदापूर) यांच्या सहकार्याने हे इंजेक्शन विक्री करत असल्याची कबुली पोलिसांना दिली. यातील प्रशांत घरत आणि शंकर भिसे हे दोघे इंजेक्शन विक्री करत. तर विमा सल्लागार असलेला दिलीप गायकवाड हा या प्रकरणात मास्टरमाईंड म्हणून काम करत होता.

आरोपींवर गुन्हा दाखल

बारामतीसह परिसरातील विविध रुग्णालयात काम करणारा संदीप गायकवाड हा रेमडेसिवीरच्या रिकाम्या बाटल्या आणि पॅकींग पुरवण्याचे काम करत होता. एका इंजेक्शनला 35 हजार रुपये एवढी किंमत ही टोळी वसूल करत होती. त्यांच्यावर भादंवि कलम 420/34, औषधे आणि सौंदर्य प्रसाधने कायदा, औषध किंमत अधिनियम यातील विविध कलामांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेत.

या टोळीने अनेकांना हे इंजेक्शन विकल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. त्यानुसार या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात करण्यात आलीय. अन्न व औषध विभागानेही या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केलीय. त्यामुळे यात आणखी कोणते आरोपी निष्पन्न होतात आणि त्यांनी कुणाकुणाला या इंजेक्शनची विक्री केली हे लवकरच समोर येणार आहे.

हेही वाचा : कोरोनाची तिसरी लाट कधीही उसळेल, कायमस्वरुपी नियोजन करा, उद्धव ठाकरेंचं उद्योगांना आवाहन

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.