गौतमी पाटील हिने लावणी बिघडवली तर इंदूरीकर महाराज यांना लोक नावे ठेवतात
मागील आठवड्यात गौतमी पाटील आणि इंदुरीकर महाराज यांच्यात वाद निर्माण झाला होता. आता दोघांना सल्ला देण्यात आला आहे. ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांनी इंदुरीकर महाराज आणि गौतमी पाटील यांच्यावर टीका करत आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला आहे.
योगेश बोरसे, पुणे : सध्या चर्चेत असलेली नृत्यांगना गौतमी पाटील अन् इंदुरीकर महाराज यांचा वाद काही दिवसांपूर्वी रंगला होता. इंदुरीकर महाराज यांनी गौतमी पाटील हिच्यावर टीका केली होती. गौतमी पाटील तीन गाण्यासाठी तीन लाख रुपये घेते. आम्ही फक्त 5 हजार रुपये वाढवून मागितले तर बाजार मांडल्याचा आरोप होतो. गौतमीच्या कार्यक्रमात राडा होतो. मुलांचे ढोपर फुटतात. पोलिसांना बंदोबस्त ठेवावा लागतो. मग गौतमीला संरक्षण दिलं जातं. आम्हाला संरक्षण नसतं, अशी टीका इंदुरीकर महाराज यांनी केली होती. इंदुरीकर महाराज यांच्या या टीकेवर गौतमी पाटील हिने प्रतिक्रिया दिली होती. तसेच सोशल मीडियातून इंदुरीकर महाराज यांच्यावर प्रचंड टीका झाली होती. आता दोघांनाही आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
कोणी दिला दोघांना सल्ला
ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांनी इंदुरीकर महाराज आणि गौतमी पाटील यांच्यावर टीका केली आहे. दोघांनाही आपापल्या क्षेत्रातील लोकं नावं ठेवतात. गौतमी पाटील हिने लावणीची संस्कृती बिघडवली आणि वारकरी सांप्रदायातील लोकंही इंदुरीकर महाराजांना नावं ठेवतात, असे सदानंद मोरे यांनी म्हटले आहे. यामुळे दोघांनीही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, अशी खोचक टीका सदानंद मोरे यांनी केली आहे. पुण्यात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलंय.
का केली टीका
गेल्या आठवड्यात इंदुरीकर महाराज आणि गौतमी पाटील यांच्यात किर्तनांचे पैसे आणि लावणीचे पैसे यावरून वाद निर्माण झाला होता. गौतमी पाटील तीन गाण्यासाठी तीन लाख रुपये घेते. आम्ही फक्त 5 हजार रुपये वाढवून मागितले तर बाजार मांडल्याचा आरोप होतो, असे इंदूरीकर महाराज म्हणाले होते.
त्यावर बोलताना गौतमी पाटील म्हणाली होती की, मी काय बोलणार त्यांच्याविषयी. फक्त गैरसमज नका करू. महाराजांचा गैरसमज झाला आहे. ते सांगतात तेवढं मानधन नाही. हे प्रेक्षकांनी ही ध्यानात घ्यावं. मी तिन गाण्याला तीन लाख रुपये घेतले असते तर लोकांनी माझ्या कार्यक्रमाचे आयोजनच केले नसते. आमच्या टीममद्ये 11 मुली असतात. एकूण 20 जणांची आमची टीम आहे. या सर्वांचा खर्च मोठा आहे. त्यामुळे मानधन आम्ही घेतो. पण महाराज सांगतात तेवढं घेत नाही. आणि तीन गाण्यासाठी तीन लाख रुपये कोणीही देणार नाही, असं गौतमी पाटील म्हणाली होती.