Gautami patil : गौतमी पाटील आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणात यु-टर्न, पोलिसांना मिळाला आरोपी पण…

Gautami Patil Viral Video : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आलेली नृत्यांगना गौतमी पाटील हिचा चेंजिंग रुममधील व्हिडिओ व्हायलर झाला होता. या प्रकरणी पोलीस तपासात यु-टर्न मिळाला आहे. पोलिसांना आरोपी मिळाला आहे, पण...

Gautami patil : गौतमी पाटील आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणात यु-टर्न, पोलिसांना मिळाला आरोपी पण...
gautami patilImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 04, 2023 | 10:38 AM

कुणाल जायकर, अहमदनगर : अल्पवधीत प्रसिद्ध झालेली नृत्यांगना गौतमी पाटील ( Gautami Patil Viral Video ) हिचा चेंजिंग रूममधील कपडे बदलतांनाचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. सोशल मीडियावर ( Gatutami Patil Social Media ) व्हायरल झालेल्या या व्हिडिओ प्रकरणानंतर राज्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. या प्रकरणी पुणे पोलिसांमध्ये तक्रारही दाखल करण्यात आली होती. त्यानंतर महाराष्ट्र महिला आयोगाने देखील दखल घेतली होती. काही संघटनांनी आरोपीला अटक करा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा दिला होता. आता या प्रकरणी पोलिसांना आरोपी मिळाला आहे.

सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया

गौतमी पाटील हिच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. त्यामध्ये नेटकऱ्यांनी गौतमी पाटील हिचा व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केला होत्या. आता पोलिसांनी या प्रकरणी कारवाई केली आहे.

हे सुद्धा वाचा

कोण आहे आरोपी

राज्यभरात प्रसिद्धीच्या झोतात आलेली लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील हिचा चेंजिंग रूममधील कपडे बदलतानाचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल करण्यात आला होता. या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील पिसोरेखांड येथील एकाचे नाव समोर आले आहे. परंतु हा आरोपी अल्पवयीन आहे. येथील १७ वर्षीय मुलाने गौतमी पाटील या नावाने बनावट इन्स्टाग्राम अकाउंट उघडून तिचे फोटो व्हायरल केले.

वापरले आईचे सीमकार्ड

विशेष म्हणजे त्या अल्वपयीन मुलाने वापरलेले सिम कार्ड त्याच्या आईच्या नावावर आहे. आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला नोटीस देऊन गुरुवारी पुणे विमाननगर पोलीस ठाण्यात बोलवले आहे. आई- वडील आणि मुलगा यांना हजर होण्यास सांगितले आहे.

गौतमी पाटील काय म्हणते

व्हायरल व्हिडिओ प्रकरणात आरोपी मिळाल्यानंतर गौतमी पाटील हिने समाधान व्यक्त केले आहे. ती म्हणाली, पुणे पोलिसांकडून खूप सहकार्य मिळाले. एक आरोपी मिळाला आहे. तो अल्पवयीन आहे. आणखी दोन, तीन आरोपी आहेत. पोलीस त्यांनाही ताब्यात घेतील.

गौतमी पाटील हिने, रघुवीर खेडकर यांना आव्हान दिले आहे. ती म्हणाली, माझ्या कार्यक्रमाला 5 लाख देतात त्यांना माझ्यासमोर आणाच. माझी इतकी फी नाही आणि राहिला प्रश्न लावणीचा तर मी लावणी करत नाही. माझा डिजे नृत्याचा कार्यक्रम असतो, असेही गौतमीने म्हटलं आहे.

हे ही वाचा

गौतमी पाटील हिला टक्कर देणारा कोण आहे पवन चव्हाण, पाहा त्याच्या भन्नाट डान्सचा Video

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.