पुणे, मुंबईत १०१ किलो सोने पकडले, कोठून अन् कसे आले होते सोने

नेपाळमार्गे सोन्याची तस्करी भारतात होत होती. नेपाळवरुन पाटणात सोने येत होते. त्यानंतर ट्रेन आणि फ्लाइटने मुंबईला आणले जात होते.

पुणे, मुंबईत १०१ किलो सोने पकडले, कोठून अन् कसे आले होते सोने
आजचा भाव काय
Follow us
| Updated on: Feb 22, 2023 | 11:18 AM

पुणे : देशातील सोन्याच्या तस्करीचे मोठे प्रकरण बाहेर आले आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) देशातील काही शहरांमध्ये मोठी कारवाई केली आहे. त्यात पाटणासह पुणे आणि मुंबईचा समावेश आहे.या कारवाईत एकूण 101.7 किलो तस्करीचे सोने जप्त करण्यात आले आहे. त्याची एकूण किंमत सुमारे 51 कोटी रुपये आहे. यातील 21 कोटी रुपयांचे सोने पाटण्यात जप्त करण्यात आले आहे. पाटण्याहून तिसरी खेप पाठवण्याची तयारी सुरू होती. त्यापुर्वीच अधिकाऱ्यांनी सोने पकडले. या प्रकरणी 10 जणांना अटक केली आहे.

DRI अधिकाऱ्यांनी ऑपरेशन गोल्डन डॉन-पॅन इंडियाचा खुलासा केला. या मोहिमेतंर्गतडीआरआयच्या पथकाने सोन्याच्या तस्करीत सहभागी असलेल्या 10 जणांना अटक केली आहे. यापैकी 7 सुदानचे नागरिक आहेत. तीन आरोपी मुंबईतील आहेत. आता डीआरआय टीम त्यांच्या संपूर्ण नेटवर्कची चौकशी करत आहे. जप्त केलेली सोन्याची खेप दुबईची आहे.

हे सुद्धा वाचा

कशी होत होती तस्करी

नेपाळमार्गे सोन्याची तस्करी भारतात होत होती. नेपाळवरुन पाटणात सोने येत होते. त्यानंतर ट्रेन आणि फ्लाइटने मुंबईला आणले जात होते. आतापर्यंत मुंबईला दोन वेळा सोने पाठवले गेले. पाटण्याहून तिसरी खेप पाठवण्याची तयारी सुरू होती. त्यापुर्वीच अधिकाऱ्यांनी सोने पकडले.

कधी झाली कारवाई

पहिली कारवाई १९ फेब्रुवारीच्या रात्री पाटण्यात झाली. पाटणा जंक्शन येथून सुदानच्या दोन नागरिकांसह मुंबईतील एका हँडलरला पकडण्यात आले. हे तिघेही पटनाहून मुंबईच्या लोकमान्य टिळकांकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढले होते. पथकाने तिघांनाही ट्रेनमधून पकडले. सुदानी नागरिकांकडून 40 पॅकेटमध्ये 37.126 किलो वजनाची सोन्याची पेस्ट जप्त करण्यात आली आहे.

कसे लपवले होते सोने

जॅकेटमध्ये खास बनवलेल्या पॅकेटमध्ये सोने लपवून ठेवले होते. तिसरा व्यक्ती नेपाळ सीमेवरून भारतीय सीमेपर्यंत तस्करीच्या कारवाया करत असे. तो एक उत्तम हँडलर आहे. यासोबतच सोन्याची तस्करी करणार्‍यांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवण्यासाठी प्रवासाची व्यवस्था केली जात होती. पाटण्यात सापडलेल्या सोन्याच्या या मालाची किंमत २१ कोटींहून अधिक आहे.

दोन महिलांना पकडले

पाटणा येथून अटक करण्यात आलेल्या तीन सोन्याच्या तस्करांची डीआरआय अधिकाऱ्यांनी चौकशी केली. यानंतर त्यांच्याकडून महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. त्याच आधारे दुसऱ्या पथकाने पुण्यात छापा टाकला. पुण्याहून मुंबईकडे जाणारी बस थांबवण्यात आली. त्यात प्रवास करणाऱ्या सुदानमधील दोन महिलांना पकडण्यात आले. त्याच्या बॅगेतून 5.615 किलो तस्करीचे सोने जप्त करण्यात आले. मुंबईतील रेल्वे स्थानकावर सुदानच्या दोन नागरिकांना पकडण्यात आले. दोघांकडून 40 पॅकेटमधील 38.76 किलो सोने जप्त करण्यात आले. दोघेही पटना येथूनच ट्रेनने मुंबईला पोहोचले होते. 20 फेब्रुवारी रोजी पुणे आणि मुंबईत ही कारवाई झाली.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.