पुणे शहरात दहशतवाद्यांची मोठी साखळी, ‘सर्वांची झोप उडले असे…’ पालकमंत्र्यांनी दिली जाहीर कबुली
Pune Crime News : पुणे शहरात दीड वर्षांपासून दहशतवादी राहत होते. या दोन्ही दशतवाद्यांना पकडण्यात आले. त्यानंतर तपासातून धक्कादायक माहिती समोर येत गेली. दहशतवाद्यांचे कनेक्शन उघड होते गेले. आता...
पुणे | 22 ऑगस्ट 2023 : पुणे शहरात १८ जुलै रोजी पोलिसांनी दोन दशतवाद्यांना अटक केली होती. त्यापूर्वी मुंबई अन् पुणे शहरात ३ जुलै रोजी काही जणांना अटक केली होती. यानंतर पुणे शहर दहशतवाद्यांचे केंद्र झाले की काय? अशी प्रकरणे उघड होऊ लागली. दहशतवादी प्रकरणाचा तपास एटीएस आणि एनआयएने केला. त्यानंतर आता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रथमच या प्रकरणावर जाहीरपणे मत मांडले. पालकमंत्र्यांनी पुणे शहरात दहशतवाद्यांची साखळी कार्यरत असल्याची कबुली दिली.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील
पुणे शहरात दहशतवाद्यांची मोठी साखळी आहे. या संदर्भात मला माहिती जाहीर करण्यास मर्यादा आहेत. परंतु पुण्यात अतिरेक्यांची मोठी लिंक सापडली आहे. मी कमी बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे. आपणास सर्वांना हदरा बसेल, आपली झोप उडेल, अशी मोठी लिंक दहशतवाद्यांची आहे. या दहशतवाद्यांचे धागेदोरे कुठे कुठे जात आहेत, ते जाहीरपणे सांगण्यास मर्यादा आहेत. पोलिसांनी त्यांना पकडले. त्यावेळी त्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. तिसरा साथीदार फरार झाला. परंतु दोघांना पोलिसांनी पकडले. या संदर्भात तपासातून उघड झालेल्या माहितीमुळे आपली सर्वांची झोप उडेल, अशी ही साखळी आतापर्यंत तपासातून उघड झाली आहे.
आतापर्यंत काय झाले उघड
इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशवादी संघटनांशी पुण्यातील दहशतवाद्यांचे संबंध समोर आले आहे. तसेच हे दशतवादी स्टुडंट इस्लामिक मुव्हेमेंट ऑफ इंडिया म्हणजेच सिमी आणि इंडियन मुजाहिदीन या बंद पडलेल्या संघटनांचे पुनर्जीवन करत होते, हे तपासातून समोर आले आहे. या संघटनांना विदेशातून फंडीग मिळत आहे. इसिसचा हँडरल त्यांना हँडल करत असलल्याचे तपासातून समोर आले होते. मुंबईतील तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी साकीब नचान हा या प्रकरणात महत्वाचा दुवा उघड झाला आहे.
एनआयएचा छापे अन्…
पुणे शहरातील दहशतवादी प्रकरणाचा तपास सुरुवातील एटीएसने केले. त्यानंतर या प्रकरणाची गांभीर्य ओळखून एनआयएने तपासाची सूत्रे हाती घेतली. एनआयएने कोंढवा परिसरात दोन ते तीन वेळा छापाही टाकला. या छाप्यात दहशवाद्यांची प्रयोगशाळाच सापडली. त्यात बॉम्ब बनवण्याचे साहित्य होते. तसेच अनेक आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले होते.