आरोग्य मंत्र्याच्या ताफ्यातील कारला अपघात, सावंत यांना किरकोळ मार; नेमकं काय घडलं?

रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्यात तानाजी सावंत यांनी कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटवर भाष्य केलं. नव्या व्हेरियंटच्या दृष्टीने आधीच तयारी झाली आहे. नवा व्हेरिएंट सौम्य आहे. केरळमध्ये कोरोनामुळे तीनजण दगावले. मात्र, या रुग्णांमध्ये जेएन-1ची लागण नव्हती, अशी माहिती आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिली.

आरोग्य मंत्र्याच्या ताफ्यातील कारला अपघात, सावंत यांना किरकोळ मार; नेमकं काय घडलं?
Maharashtra Minister AccidentImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 24, 2023 | 6:02 PM

कोल्हापूर | 24 डिसेंबर 2023 : आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या ताफ्यातील गाडीला कोल्हापुरात अपघात झाला आहे. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. या अपघातात तानाजी सावंत आणि त्यांचे स्वीय सहाय्यक किरकोळ जखमी झाले आहेत. तानाजी सावंत हे कोल्हापूरमधून जात होते. कोल्हापूर-पन्हाळा मार्गावर राजपूत वाडी येथे हा भीषण अपघात झाला. या अपघातात कारचा चेंदामेंदा झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

कोल्हापुरात करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेतल्यानंतर आरोग्यमंत्री तानाजी सावंत जोतिबाच्या दर्शनासाठी जात होते. सावंत ज्या कारमधून जात होते, त्याच्या मागे असलेल्या कारला एका कारने जोरदार धडक दिली. त्यामुळे सावंत यांच्या ताफ्यातील कारचा चक्काचूर झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातात सावंत यांना अगदी किरकोळ मार लागला आहे. त्यांच्या स्वीय सहाय्यकालाही मार लागला आहे. कोल्हापूर-पन्हाळा मार्गावर हा अपघात झाला आहे.

सावंतांकडून विचारपूस

दुर्घटना घडल्यानंतर सावंत यांनी गाडीतून उतरून जखमींची विचारपूस केली. त्यानंतर त्यांचा ताफा रवाना झाला. हा अपघात झाल्यानंतर जिल्हा प्रशासानाकडून सावंत यांना रुग्णवाहिका देण्यात आली नसल्याचं सांगितलं जात आहे. सावंत यांच्या ताफ्यात जिल्हा प्रशासनाची रुग्णवाहिकाच नव्हती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

म्हणून कार्यक्रमाला दांडी

सावंत यांनी कोल्हापुरातील गोरगोटी उपजिल्हा रुग्णालयाचं उद्घाटन केलं. या सोहळ्याला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी पाठ फिरवली. तानाजी सावंत यांच्या हस्ते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली हा लोकार्पण सोहळा होणार होता. पण मुश्रीफ कोल्हापूरचे असूनही सोहळ्याला आले नाही. आमदार प्रकाश आबिटकर यांच्या मतदारसंघात हा कार्यक्रम होता. त्याला मुश्रीफ यांनी दांडी मारल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. काही दिवसापूर्वी झालेल्या बिद्री सहकारी साखर कारखान्यात हसन मुश्रीफ आणि प्रकाश आबिटकर आमनेसामने आले होते. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

नवा व्हेरिएंट सौम्य

दरम्यान, रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्यात तानाजी सावंत यांनी कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटवर भाष्य केलं. नव्या व्हेरियंटच्या दृष्टीने आधीच तयारी झाली आहे. नवा व्हेरिएंट सौम्य आहे. केरळमध्ये कोरोनामुळे तीनजण दगावले. मात्र, या रुग्णांमध्ये जेएन-1ची लागण नव्हती, अशी माहिती देतानाच कालच टास्क फोर्ससोबत बैठक झाली. रमण गंगाखेडकर हे टास्क फोर्स चे प्रमुख असतील. त्यांच्या सोबत काल माझी बैठक झाली आहे. येत्या काळात गर्दीचे कार्यक्रम आहेत. नागरिकांनी काळजी घेऊन गर्दीच्या कार्यक्रमाला जायला हवं. राज्यातील सर्व सरकारी हॉस्पिटलमध्ये या बाबत मॉक ड्रिल घेतलं आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.