चोरट्यांची हिंमत पाहा, पोलीस मुख्यालयातून केली चोरी, मग चर्चा तर होणारच

Pune Crime News : पुणे शहरातील गुन्हेगारांवर गेल्या काही महिन्यांपासून सतत चर्चा होत आहे. कोयता गँगमुळे पुणे शहरातील नागरिक चांगलेच दहशतीत आहेत. आता पुण्यातील चोरट्यांची हिंमत पोलीस ठाण्यात चोरी करण्यापर्यंत वाढली आहे.

चोरट्यांची हिंमत पाहा, पोलीस मुख्यालयातून केली चोरी, मग चर्चा तर होणारच
पती-पत्नीच्या वादातून मेव्हण्याने भावोजीला संपवले
Follow us
| Updated on: Jul 23, 2023 | 1:18 PM

प्रदीप कापसे, पुणे | 23 जुलै 2023 : पुणे तेथे काय उणे असे नेहमी म्हटले जाते. मग पुणे शहरातील चोर गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असताना, यापासून पोलिस मुख्यालयही वाचलेले नाही. चोरट्यांनी थेट पोलीस मुख्यालयाकडेच वक्रदृष्टी वळवली आहे. चोरट्यांनी पुणे पोलीस ग्रामीण मुख्यालायत चोरी केली आहे. यामुळे पुण्यात पोलीस ठाणीच चोरट्यांपासून सुरक्षित नाही, अशी चर्चा सुरु झाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कितीचा ऐवज झाला चोरी

पुणे पोलिसांच्या ग्रामीण मुख्यालयाच्या आवारात चोरी करण्याचा प्रकार घडला आहे. पोलीस मुख्यालयातून 80 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. चोरट्यांनी ज्या ठिकाणी सतत पोलीस असतात त्या ठिकाणी चोरीचे धाडस केले आहे. त्यामुळे पोलीस स्टेशनच्या आवारातच चोरी झाल्याने चर्चा सुरु झाली आहे.

हे सुद्धा वाचा

पोलिसांना घ्यावा लागणार चोरांचा शोध

गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांची सर्वात महत्वाची भूमिका असते. त्यासाठी पोलिस रोज रात्री शहरात नियमित पेट्रोलिंग करत असतात. पोलिसांची पेट्रोलिंग सुरु असताना अनेक चोर पकडले गेले आहेत. काही वेळा चोरी, दरोडेही रोखले गेले आहेत. परंतु ज्या ठिकाणी पोलिसांचा २४ तास बंदोबस्त असतो, पोलिसांची मोठा ताफा असतो, त्या ग्रामीण पोलीस मुख्यालयात चोरी झाली आहे. यामुळे पुणे शहरात हा चर्चेचा विषय ठरला आहे. आता पोलीस मुख्यालयातील चोरीचे आरोपी शोधण्याचे काम करण्याची जबाबदारी चतु:शृंगी पोलीस ठाण्यावर आली आहे. पोलीस ठाण्यात चोरी करणारे हे चोरी किती दिवसांत सापडतात? हे आता पाहावे लागणार आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.