Amit Shah : अमित शाह यांच्या सर्व बैठका रद्द, कार्यक्रमानंतर तातडीने दिल्लीला जाणार
Pune News : केंद्रीय मंत्री अमित शाह दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आले होते. त्यांच्या या दौऱ्यात अचानक बदल झाला आहे. आता अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना होणार आहेत. त्यांच्या सर्व बैठका रद्द केल्या आहेत.
योगेश बोरसे, पुणे | 6 ऑगस्ट 2023 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शनिवारी संध्याकाळी पुणे शहरात दाखल झाले होते. त्यांचा दोन दिवसांचा पुणे दौरा होता. शनिवार अन् रविवारी पूर्ण दिवस अमित शाह यांचा मुक्काम पुणे शहरात होता. दोन दिवसांच्या त्यांच्या या दौऱ्यात फक्त सहकार विभागाकडून आयोजित एक कार्यक्रम होता. त्यानंतर त्यांचा इतर सर्व वेळ राखीव ठेवला होता. परंतु आता त्यांच्या या दौऱ्यात अचानक बदल केला गेला आहे. आता अमित शाह कार्यक्रमानंतर तातडीने दिल्लीला रवाना होणार आहे.
सर्व बैठका रद्द
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यात अचानक बदल झाला आहे. अमित शहा सहकार विभागाचा कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते ‘सहकार से समृद्धी ‘ पोर्टलचे उद्घाटन होणार आहे. दुपारी १२ वाजता पिंपरी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे मल्टीपर्पज हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम झाल्यानंतर त्यांचा वेळ राखीव होता. कार्यक्रमानंतर अमित शाह थांबलेल्या हॉटेलमध्ये परत जाणार होते. त्याठिकाणी बैठका होणार होत्या. त्या बैठका अमित शह यांनी रद्द केल्या आहेत. आता अमित शहा 3 वाजता पुणे विमानतळावरून थेट दिल्लीला रवाना होणार आहे.
अमित शाह यांना भेटण्यासाठी तिन्ही नेते
अमित शाह यांच्या दौऱ्यात बदल झाला आहे. सहकार विभागाचा कार्यक्रम संपवून अमित शाह डब्ल्यू मेरियट हॉटेलला येणार होते. त्या ठिकाणी बैठकांचे आयोजन केले होते. परंतु कार्यक्रम झाल्यानंतर अमित शाह तातडीने दिल्लीला जाणार आहे. यामुळे या बैठका सकाळी ११ वाजताच सुरु झाल्या आहेत.
अमित शाह यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार डब्ल्यू मेरियट हॉटेलला दाखल झाले आहेत. या चारही नेत्यांमध्ये बैठक सुरु झाली आहे. या बैठकांमध्ये मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच राज्यात भाजपच्या मिशन ४५ यासंदर्भात रणनिती बैठकीत करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.