Pune Fire : पुणे हॉटेलमध्ये भीषण आग, 2 कामगारांचा होरपळून मृत्यू

Pune Hotel Fire : पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून आगीच्या घटना वाढत आहे. आता पुन्हा एका हॉटेलला आग लागली. या आगीत दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. एक जण जखमी झाला आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील टिंबर मार्केटला भीषण आग लागली होती.

Pune Fire : पुणे हॉटेलमध्ये भीषण आग, 2 कामगारांचा होरपळून मृत्यू
Follow us
| Updated on: Jun 13, 2023 | 11:31 AM

पुणे : पुणे शहरात काही दिवसांपूर्वी मध्यरात्री आगीच्या दोन मोठ्या घटना घडल्या होत्या. पुणे शहरातील वाघोली येथे गोडाऊनला भीषण आग लागली. या आगीत तीन जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पुण्यातील टिंबर मार्केटमध्येही मोठी आग लागली होती. आगीच्या या घटनानंतर सोमवारी मध्यरात्री एका हॉटेलला भीषण आग लागली. या आगीत दोन कामगारांचा मृत्यू झाला. दोन मजले असणाऱ्या मार्केट यार्डमधील हॉटेलमध्ये ही आग लागली होती.

कुठे लागली आग

पुणे येथील मार्केटयार्डमधील गेट नंबर एकजवळ हॉटेल रेवळ सिद्धी आहे. या हॉटेलला सोमवारी रात्री १ वाजेच्या सुमारास आग लागली. आग लागल्याचे समजताच अग्निशमन दलाला तत्काळ घटनास्थळी पाचारण करण्यात आले. अग्नीशमन दलाच्या गंगाधाम, कोंढवा खुर्द आणि मुख्यालयातून एक फायरगाडी व जंम्बो वॉटर टँकर घटनास्थळी रवाना करण्यात आले.

शटरचे कुलूप तोडले

अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचल्यावर अग्नीशमन दलाच्या जवानांना हॉटेलमध्ये तीन कामगार अडकले असल्याचे समजले. यावेळी शटरला आतमधून कुलूप होते. जवानांनी तातडीने बोल्डकटर शटर तोडले. आता जाऊन जवानांनी आगीवर पाण्याचा मारा सुरू केला. त्यावेळी अडकलेल्या 3 जखमी कामगारांना बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढण्यात आले.

हे सुद्धा वाचा

दोघांचा मृत्यू

तिन्ही कामगारांना उपचारासाठी शासकीय रुग्णवाहिका क्रमांक १०८ मधून ससून रुग्णालयात रवाना पाठवले. मात्र दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आगीचे कारण अद्याप समजू शकलेलं नाही. आग तळमजल्यावरील भटारखान्यातून सुरू झाली आणि त्याचा धूर मोठ्या प्रमाणवर निर्माण झाला होता. या ठिकाणी असलेले चार सिलेंडर देखील बाहेर काढण्यात आले. अन्यथा मोठा अनर्थ झाला असता.

2022 मध्ये हॉटेलला लागली होती आग

2022 रोजी पुण्यातील लुल्ला नगर भागातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये आग लागली होती. त्यानंतर जून 2022 मध्ये पुण्यातील रूफ टॉप रेस्टॉरंटमध्ये भीषण आग लागली होती. त्या घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या.

मे महिन्यात आग

पुणे शहरातील वाघोली येथे गोडाऊनला मे २०२३ मध्ये भीषण आग लागली. या आगीत गोडाऊनमध्ये असलेले ४ सिलेंडर फुटले. आगीनंतर त्वरीत पुणे येथील अग्नीशमन दलाच्या ५ तर पीएमआरडीए ४ अशी एकूण ९ अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर अग्नीशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश झाले. परंतु या आगीत तीन जणांचा मृत्यू झाला होता.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.