पुणे शहरात विदेशी कंपनीचा येणार मोठा प्रकल्प, चार हजार कोटींची गुंतवणूक

Hyundai Company Invest In Pune : राज्यात गुंतवणुकीवरुन दोन सरकारमध्ये काही महिनांवरुन वाद झाला होता. आता राज्यात मोठी गुंतवणूक येणार आहे. पुणे शहरात चार हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. त्यातून चांगली रोजगारनिर्मिती होईल.

पुणे शहरात विदेशी कंपनीचा येणार मोठा प्रकल्प, चार हजार कोटींची गुंतवणूक
InvestmentImage Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 13, 2023 | 7:38 AM

पुणे | 13 ऑगस्ट 2023 : राज्यातील गुंतवणुकीवरुन काही महिन्यांपूर्वी महाविकास आघाडी आणि युती सरकारमध्ये आरोप, प्रत्यारोप झाले होते. वेदांता फॅाक्सकॅान, एअरबस प्रकल्प, सॅफ्रन प्रकल्प आणि बल्क ड्रग पार्क हे चार प्रकल्प गेल्या वर्षभरात राज्याकडून निसटले. त्यास कोणते सरकार जबबादर होते, हा वाद रंगला होता. त्यानंतर त्यावर श्वेतपत्रिका काढण्यात आली होती. ही श्वेतपत्रिका पावसाळी अधिवेशनात मांडली गेली. यामध्ये हे प्रकल्प राज्याबाहेर का गेले हे मांडण्यात आले. आता राज्यात गुंतवणूक पर्व सुरु झाल्याचे चित्र दिसत आहे. पुणे शहरात गुंतवणूक आली आहे.

कोणती कंपनी करणार गुंतवणूक

वाहन निर्मिती क्षेत्रातील जगप्रसिद्ध कंपनी ‘ह्युंदाई’ ने भारतात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कंपनी राज्यातील पुणे शहरामध्ये गुंतवणूक करणार आहे. दोन टप्प्यांत ही गुंतवणूक केली जाणार आहे. एकूण पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक पुणे शहरात करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ह्युंदाई कंपनीचे पुरवठादारही पुण्यात चार हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

काय म्हणाले उदय सामंत

पुणे शहरात ह्युंदाई कंपनी व्यतीरिक्त ‘एलजी’ कंपनी आपला विस्तार करणार आहे. एलची कंपनी सुमारे ९०० कोटींची गुंतवणूक करणार आहे. ‘ह्युंदाई’ कंपनीच्या गुंतवणुकीमुळे पुणे शहरात चार हजार ५०० जणांना रोजगार मिळणार आहे. ही कंपनी २०२८ पर्यंत गुंतवणूक करणार आहे. ‘लोट्टे वेलफूड’ ही कंपनी त्यांच्या पुणे येथील प्रकल्पात ४७५ कोटी रुपये गुंतवणार आहे. ही कंपनी हॅवमोअर ब्रँडचे उत्पादन करणार आहे.

हे सुद्धा वाचा

राज्याचे शिष्टमंडळ गेले होते विदेशात

राज्याचे शिष्टमंडळ दक्षिण कोरियात गेले होते. त्यावेळी अनेक कंपन्यांशी चर्चा झाली आहे. त्यातून मोठी गुंतवणूक राज्यात येणार आहे. दक्षिण कोरियाचे एक शिष्टमंडळ लवकरच राज्यात येणार आहे. त्यावेळी अनेक करार होणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली. राज्यात गुंतवणूक करण्यास अनेक कंपन्या तयार आहेत. यामुळे येत्या काळात राज्यात मोठी गुंतवणूक प्रकल्प येतील आणि रोजगार निर्मिती होईल, असे सामंत यांनी सांगितले.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.