Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्योतिषाचं काम घ्यावं इतकी माझी वाईट अवस्था नाहीये; शरद पवारांचा नेमका टोला कुणाला?

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे येत्या 10 मार्च रोजी निकाल हाती येणार आहेत. या पाचही राज्यात कुणाची सत्ता येईल याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारण्यात आलं असता त्यांनी मार्मिक उत्तर दिलं.

ज्योतिषाचं काम घ्यावं इतकी माझी वाईट अवस्था नाहीये; शरद पवारांचा नेमका टोला कुणाला?
ज्योतिषाचं काम घ्यावं इतकी माझी वाईट अवस्था नाहीये; शरद पवारांचा नेमका टोला कुणाला? Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 05, 2022 | 2:22 PM

पुणे: पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे येत्या 10 मार्च रोजी निकाल हाती येणार आहेत. या पाचही राज्यात कुणाची सत्ता येईल याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांना विचारण्यात आलं असता त्यांनी मार्मिक उत्तर दिलं. ज्योतिषाचं काम घ्यावं इतकी काही माझी वाईट अवस्था झाली नाही. मी काही ज्योतिषाचं काम घेतलं नाही. बघुया काय होतं ते, असा टोला शरद पवार यांनी लगावला. शरद पवार यांनी हा टोला भाजपला (bjp) लगावल्याचं सांगितलं जात आहे. येत्या 7 मार्च रोजी उत्तर प्रदेशात (uttar pradesh) सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. त्यानंतर उत्तरप्रदेशसहीत पाचही राज्यांचे येत्या 10 मार्च रोजी निकाल लागणार आहेत. त्यानंतर या राज्यात कुणाची सत्ता येईल हे स्पष्ट होणार आहेत. शरद पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर भाष्य केलं. त्यावेळी त्यांना या पाच राज्यांच्या निकालावर भाष्य करणं टाळलं.

शरद पवार यांनी यावेळी नवाब मलिक यांना क्लिनचीट दिली. नवाब मलिक यांना राजकीय हेतूनेच अटक करण्यात आली आहे. ते गेल्या 20 वर्षांपासून विधानसभेत आहेत. त्यांच्यावर इतक्या वर्षात कधीच आरोप झाले नाहीत, असं शरद पवार यांनी सांगितलं. आता त्यांचे संबंध दाऊदशी असल्याचा दिसतोय. एखादा मुस्लिम कार्यकर्ता असला तर त्याला दाऊदचा जोडीदार धरलं जातं. कारण नसताना आरोप केला जातो. मला त्याची चिंता नाही. कधीकाळी माझ्यावरही आरोप केले होते. हे लोक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. मला चिंता करण्याचं कारण नाही. नवाब मलिक यांच्यावर चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जातेय. त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांना यातना दिल्या जात आहेत. जाणूनबाजून हे केलं जातंय, असं शरद पवार म्हणाले.

तर तेलाच्या किंमती भडकतील

लिबीयाच्या युद्धावेळीही तत्कालीन सरकारला आपले नागरिक मायदेशात लवकर आणता आले नव्हते असा आरोप भाजपकडून होत आहे. त्याकडे शरद पवार यांचे लक्ष वेधण्यात आले असता त्यांनी हा आरोप फेटाळून लावला. याबाबत सामान्य माणसाला प्रश्न विचारा. लिबीयाचा विषय कुणाला माहीतही नाही. तो लहान देश होता. युक्रेन-रशियातील स्थिती कितीतरी गंभीर आहे. त्यामुळे आपल्या मुलांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. या मुलांची जशी काळजी आहे, तशीच रशिया आणि युक्रेनच्या संघर्षामुळे देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर काय परिणाम होणार याचीही मला चिंता लागली आहे. सूर्यफुल हे महत्त्वाचं खाद्य तेल देणारं पीक आहे. युक्रेनमध्ये त्याचं मोठं उत्पादन होतं. त्यामुळे सूर्यफूल तेलाच्या किंमती वाढतील. त्याची झळ सामान्य लोकांना बसेल. त्यात केंद्राने लक्ष घातलं पाहिजे, असं शरद पवार म्हणाले.

म्हणून रशिया किंवा युक्रेनची बाजू घेतली नाही

चीन आणि भारतने कुणाची बाजू घेतली नाही. नेहरूंच्या काळापासून आपलं ते धोरण आहे. संघर्षात आपण कुणाची बाजू घेत नाही. त्यामुळे पंतप्रधानांनी जी भूमिका घेतली त्यावर टीका टिप्पणी करण्याची गरज नाही. या मुलांना बाहेर कसं आणता येईल हे पाहिलं पाहिजे. पुतिन यांच्याशी केंद्र सरकारने चर्चा केल्यानंतर पॅसेज खुला केल्याचं सांगितलं जातं. पण मुलं अडचणी सांगत आहेत. पॅसेज खुला केला, पण रशियाचा गोळीबार सुरू आहे. त्यामुळे घराबाहेर पडता येत नसल्याचं विद्यार्थी सांगत आहेत. शिवाय युक्रेनचे नागरीक भारतीय मुलांवर नाराज आहेत. तुमच्या देशाने ठोस भूमिका घेतली नसल्याचं ते सांगत आहेत, असं पवार म्हणाले.

संबंधित बातम्या:

VIDEO: राणे साहेबांनाही अटक झाली होती, त्यांचा राजीनामा घेतला का?; शरद पवारांचा भाजपला खरमरीत सवाल

फडणवीस असताना फोन टॅपिंगच्या घटना घडल्या, किंमत अधिकाऱ्यांना चुकवावी लागेल: शरद पवारांचा इशारा

नारायण राणे मालवणी पोलीस स्टेशनला पोहोचले; दिशा सालियन प्रकरणात आपली बाजू मांडणार

संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी.
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.