AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrakant Patil | ‘मी मतांची भिक मागायला आलोय ‘, चंद्रकांत पाटील यांनी फुंकलं पुणे महापालिकेच्या निवडणुकीचं रणशिंग

पालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये सध्या चंद्रकांत पाटील यांनी दौरे सुरू केले आहेत. त्यातच काल शेवाळेवाडी येथे आयोजित सभेला संबोधित करताना चंद्रकांत पाटील यांनी मी तुमच्याकडे पुणे महानगरपालिकेसाठी मतांची भीक मागायला आलोय आणि तुमची मतं बुक करायला आलेलो आहे. अस सांगतच गेल्या पाच वर्षात पुणे महानगरपालिकेमध्ये एकही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाहीये किंवा तो सिद्धही झालेला नाही असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केलेला आहे.

Chandrakant Patil | 'मी मतांची भिक मागायला आलोय ', चंद्रकांत पाटील यांनी फुंकलं पुणे महापालिकेच्या निवडणुकीचं रणशिंग
चंद्रकांत पाटलांचा राऊतांना सवाल
| Edited By: | Updated on: Feb 27, 2022 | 3:56 PM
Share

पुणे – ‘ताकाला जाऊन मला भांड लपवायची सवय नाही, मी आलोय पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत (Pune Municipal Corporation)तुमच्या मताची भीक मागायला’. असं विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)यांनी पुण्यात बोलताना केलं आहे . पुणे महानगरपालिका निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतस यात राजकारण (politics) तापताना दिसत आहे. प्रत्येक पक्ष हे कामाला लागलेले पाहायला मिळत आहेत. अशातच चंद्रकांत पाटील यांच हे विधान चर्चेत आल आहे. पुणे महापालिकेत नव्याने 34 गावे समाविष्ट झाल्यामुळे पुणे महानगरपालिकेचे लोकसंख्या तब्बल 70 लाखांवर गेली आहे, आणि अस असताना प्रगती कशी होणार असा सवाल करत पुण्यामध्ये दोन महानगरपालिका व्हायला पाहिजे अशी मागणी देखील भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलताना केली आहे .

अजित पवार यांच्यावर टीका

महानगरपालिकेत गावे समाविष्ट करण्याला माझा विरोधच, याने गावाच गावपण नष्ट होत.मात्र अजित पवारांना वाटत म्हणून ते निर्णय घेतात अशी टीका देखील चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांवर केली आहे.

वाचला विकासकामांचा पाढा

पालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये सध्या चंद्रकांत पाटील यांनी दौरे सुरू केले आहेत. त्यातच काल शेवाळेवाडी येथे आयोजित सभेला संबोधित करताना चंद्रकांत पाटील यांनी मी तुमच्याकडे पुणे महानगरपालिकेसाठी मतांची भीक मागायला आलोय आणि तुमची मतं बुक करायला आलेलो आहे. अस सांगतच गेल्या पाच वर्षात पुणे महानगरपालिकेमध्ये एकही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाहीये किंवा तो सिद्धही झालेला नाही असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केलेला आहे. त्यामुळे आगामी काळातही पुणे महानगरपालिकेत भाजपचीच सत्ता येणार असून तुम्ही आम्हाला साथ द्या असं आवाहन त्यांनी केल आहे. नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमुळे गावाचं गावपण नष्ट होतं आणि शहरात आलेला नागरिकांचा विकासही होत नाही,मात्र अजित पवारांना वाटत आपली महापालिका मोठी व्हावी कारण नंतर गावातील जमिनी हडप करयला मिळतात अशी टीका ही त्यांनी अजित पवारांवर केली आहे.

Russia America : यूक्रेनच्या युद्धानं अमेरिकेंचं महासत्तापद संपवलं, आता रशिया हाच जगाचा दादा?

24 वर्षानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ पाकिस्तानात दाखल! इतकी वर्ष का नव्हता गेला? जाणून घ्या

Vastu Tips | मनी प्लांट लावताना या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर नुकसान झालेच म्हणून समजा

नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.