Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune crime : देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत फोफावले अवैध धंदे, शाळकरी मुलगीच विकतेय दारू? पोलिसांची हाताची घडी, तोंडावर बोट!

रमेशन यांनी देहूरोड हद्दीतील अवैध धंद्यांची पोलखोल करण्यासाठी एक व्हिडिओ टीम प्रत्येक ठिकाणी पाठवली. त्यात शाळकरी मुलगी गावठी दारू विकताना व्हिडिओतून उजेडात आली आहे.

Pune crime : देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत फोफावले अवैध धंदे, शाळकरी मुलगीच विकतेय दारू? पोलिसांची हाताची घडी, तोंडावर बोट!
अवैधरित्या दारूची विक्री होत असलेलं घर Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 28, 2022 | 11:31 AM

पुणे : देहूरोड येथे एक शाळकरी मुलगी गावठी दारू (Illegal liquor) विकत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याविषयीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरत आहे. त्याची टीव्ही 9 मराठीने पडताळणी केली आहे. हा व्हिडिओ सामाजिक कार्यकर्ते श्रीजीत रमेशन यांनी काढला असल्याचे समोर आले आहे. देहूरोड पोलीस ठाण्याच्या (Dehu road police station) हद्दीत अवैध धंदे, गावठी दारूचे अड्डे असतानाही देहूरोड पोलीस हाताची घडी आणि तोंडावर बोट अशा कृतीत का? असा प्रश्न त्यांनी केला आहे. शाळकरी मुलीच्या व्हिडिओबाबत पोलीस आयुक्त अंकुश शिंदे (Ankush Shinde, Commissioner of Police, Pimpri Chinchwad) यांनी गुन्हे शाखेला चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलिसांच्या आशीर्वादाने हे अवैध धंदे सुरू असतील तर त्यांच्यावरही कारवाई करणार असल्याची माहिती त्यांनी टीव्ही 9 मराठीला दिली आहे. देहूरोड पोलीस ठाण्याचा कारभार एक महिला पोलीस अधिकारी पाहतात.

वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याचा आशीर्वाद?

अवैध धंदे, गावठी दारू बंद होईल, अशी अशा या परिसरातील सर्वांना होती. परंतु, असे काहीही घडले नाही. उलट तेथील अवैध धंदे, गावठी दारूच्या भट्ट्या अधीकच जोमात चालू लागल्याचे समोर आले आहे. वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याचा आशीर्वाद त्यांच्यावर असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते श्रीजीत रमेशन यांनी केला आहे.

व्हिडिओतून उजेडात आला प्रकार

रमेशन यांनी देहूरोड हद्दीतील अवैध धंद्यांची पोलखोल करण्यासाठी एक व्हिडिओ टीम प्रत्येक ठिकाणी पाठवली. त्यात शाळकरी मुलगी गावठी दारू विकताना व्हिडिओतून उजेडात आली आहे. विशेष म्हणजे एक महिला पोलीस अधिकारी एका शाळकरी मुलीला दारू विकण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शाळकरी मुलगी ग्राहकाला दारू किती द्यायची, अशी विचारणा करत असून घरातच हा घरगुती बार थाटल्याचे पाहायला मिळत आहे.

हे सुद्धा वाचा

काय कारवाई होणार?

एकीकडे गुन्हेगारी फोफावलेल्या पिंपरी-चिंचवडची दुसरी बाजूदेखील गुन्हेगारीने, काळवंडलेली आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ पोलीस अधिकारी याकडे कसे पाहतात आणि महिला पोलीस अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार, हे पाहावे लागणार आहे.

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.