पुण्यात ‘या’ परिसरातील घराच्या किंमती गगनाला भिडल्या ; जाणून घ्या दर
याबरोबच येरवडा, विश्रांतवाडी, रावेत, थेरगाव , ताथवडे येथेही टू बीएचके 80 ते 85 लाख रूपये मोजावे लागत आहेत. याबरोबरच शहाताचा पूर्व भाग म्हणून ओळखला जाणारा वाघोली, मांजरी, चंदनगर , लोणी काळभोर या भागाचाही झपाट्याने विकास होता आहे.
पुणे – कोरोनाच्या महामारीचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. यातच वाढत्या महागाईचा परिणाम शहरातील घरांच्या किमतींवर झालेला पाहायला मिळत आहे. बांधकाम क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या वस्तूही मोठ्या प्रमाणात महाग झाल्याने घरांच्या किमतींमध्येही वाढ झाली आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाणे असलेल्या डेक्कन , प्रभात रोड , एरंडवणे, तसेच पेठांच्या परिसरातील घराचे दर प्रतिचौरसफूट सर्वाधिक असलेले दिसून आले आहेत लोहगाव, धानोरी, सूस परिसरात घरांच्या किमती सर्वात असलेलया आढळून आले आहेत.
विकसित भागातील घरांच्या किमती
पुण्यात वास्तव्य करत असताना अनेकदा कोथरूड परिसरात आपण एकदा तरी राहिले पाहिजे अशी भावना प्रत्येकाच्या मनात असते. मात्र कोथरूड व त्याच्या आजूबाजूचा परिसर असलेल्या शिवणे , वारजे या भागात टू बीएचके प्लॅट्सच्या किंमती साधारण 80 लाखांच्या घरात आहेत. याबरोबच येरवडा, विश्रांतवाडी, रावेत, थेरगाव , ताथवडे येथेही टू बीएचके 80 ते 85 लाख रूपये मोजावे लागत आहेत. याबरोबरच शहाताचा पूर्व भाग म्हणून ओळखला जाणारा वाघोली, मांजरी, चंदनगर , लोणी काळभोर या भागाचाही झपाट्याने विकास होता आहे. तिथे मोठ्या नागरीकरण वाढीस लागले आहे. या सगळ्यामुळे त्या परिसरात वन बीएचके प्लॅट्स 30 ते 40 लाखांपर्यंत मिळत आहेत.
या भागात प्रतिचौरसफूट आहेत इतक्या किमती
डेक्कन 14 ते 16 हजार चौरस फूट , प्रभात रोड – 14 ते 16 हजार चौरस फूट, एरंडवणे- 11 ते 13 हजार चौरस फूट, कोथरूड – 8 ते 15हजार चौरस फूट , वारजे- 5 ते 7 हजार चौरस फूट, पेठ परिसर- 11 ते 12हजार चौरस फूट , भोसलेनगर – 12 ते 15 हजार चौरस फूट, कर्वेनगर 7 ते 13 हजार चौरस फूट , औंध- 7 ते 10 हजार चौरस फूट, बाणेर-7 ते 10 हजार चौरस फूट, पाषाण 6 ते 8 हजार चौरस फूट , बावधन-6 ते 10 हजार चौरस फूट असे आहेत.
Keral Murder | एकाचा गळा दाबला, तर दुसऱ्या भोसकलं! 12 तासांच्या आत दोन राजकीय नेत्यांची हत्या
Nashik| प्रियकराच्या मदतीने पतीच्या ‘माये’वर पत्नीचा डल्ला; ऐकावं ते नवलच…!
Pune | पुण्यात भाजपच्या बॅनर्सविरोधात राष्ट्रवादीकडून निषेध आंदोलन