Pune crime | नवऱ्यानं सांगितलं बंगळुरुला जातो, प्रत्यक्षात गेला बावधनला, बायकोची जासूसी, काय काय उघडं पडलं?

दरम्यान पतीने आपण कामानिमित्त बेंगळुरू जात असल्याचे सांगितले. त्यानंतर घरातून बाहेर पडलेल्या पतीचे जीपीएस लोकेशन बावधन येथील हॉटेल व्हिवा असे आढळून आले. याबाबत खात्री करण्यासाठी संबधित महिलेने इंटरनेटवरून हॉटेलचा नंबर मिळवत. तिथे फोन केला.

Pune crime | नवऱ्यानं सांगितलं बंगळुरुला जातो, प्रत्यक्षात गेला बावधनला, बायकोची जासूसी, काय काय उघडं पडलं?
Follow us
| Updated on: Feb 03, 2022 | 10:54 AM

 प्राजक्ता ढेकळे , पुणे – शहरातील बावधन परिसरात विवाहित महिलेने आपल्या पतीच्या  विवाहबाह्य अनैतिक संबंधांची(extramarital affairs) भांडाफोड  केली आहे. संबंधित पीडित पत्नीने पतीच्या वागणायचा संशय आल्याने पतीच्या चारचाकी वाहनात जीपीएस (GPS)बसवले. त्यामुळेच पतीच्या रंगेल कारनाम्यांची भांडाफोड झाली व पतीच्या विवाहबाह्य संबंधांचे बिंग फुटले. पती एका महिलेसोबत हाॅटेलमध्ये थांबला असल्याचे यातून उघड झाले. प्रकरणी पीडित महिलेनं आरोपींनी तोतयागिरी करून फिर्यादीची फसवणूक  अशी पोलिसात(Police)  तक्रार दिली . अरिफ अब्दुल मांजरा (वय 41 रा. मसाला, ता. मांगरोड, जि. सुरत) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बावधन येथील व्हिवा इन हॉटेल येथे 21 ऑक्टोबर 2020 रोजी घडला आहे.

अशी उघडकीस आली घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिलेचा 2005 मध्ये आरोपी अरिफ अब्दुल मांजरा यांच्या सोबत सुरत येथे विवाह झाला आहे. लग्नानंतर फिर्यादीचा आरोपी पती अरिफ हा कामानिमित्त बेंगळुरू येथे जात होता. काही काळ गेल्यानंतर त्याच्या वर्तनात , वागण्याबोलण्यात बदल झाला. यामुळे संबधित महिलेला पाटीवर संशय आला. माहिती काढण्यासाठी फिर्यादी महिलेने 21 ऑक्टोबर 2020 रोजी आरोपी पती अरिफच्या चारचाकी वाहनामध्ये जीपीएस डिव्हाईस लावले. त्याचा दरम्यान पतीने आपण कामानिमित्त बेंगळुरू जात असल्याचे सांगितले. त्यानंतर घरातून बाहेर पडलेल्या पतीचे जीपीएस लोकेशन बावधन येथील पंचतारांकित हॉटेल असे आढळून आले. याबाबत खात्री करण्यासाठी संबधित महिलेने इंटरनेटवरून हॉटेलचा नंबर मिळवत. तिथे फोन केला. फोनवर आरोपीच्या नावाने बुकिंग आहे का? अशी विचारणा केली. त्यावेळी तिथे आरोपी व त्याची पत्नी यांच्या नावाने बुकिंग असल्याची माहिती हॉटेलमधून देण्यात आली.

बनावट आधारकार्डद्वारे वास्तव्य

आरोपी पती अरिफ याने आपल्या पत्नीचे बनावट आधार की कार्ड वापरत हॉटेल मध्ये वास्तव्य केल्याचीमाहितीही समोर आली आहे. त्यानंतर संबधित महिलेने हाॅटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात ती महिला फिर्यादीच्या पतीसोबत असल्याचे उघड झाले. फिर्यादीने त्यांच्या मोबाईलमध्ये सीसीटीव्ही फुटेज रेकाॅर्ड करून घेतले. आरोपींनी तोतयागिरी करून फिर्यादीची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलीस उपनिरीक्षक छाया बोरकर तपास करीत आहेत.

परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचे आरोप, स्वत:च्या बचावासाठी आरोपी इतरांची नाव घेतो: संजय राऊत

Budget 2022 : अर्थसंकल्पात दिलासा नाही ; शेवटी बचत पण तर आहे कमाई

थकबाकी शेतकऱ्यांकडे नव्हे महावितरणकडेच, आंदोलनानंतरची बैठकही निष्फळ, आता तोडगा काय?

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.