Video | पुणे शहरात मुलाखतीसाठी IT इंजिनिअरची रांग, 100 जागांसाठी रांगेत 3,000 पेक्षा जास्त अभियंते
Pune News | पुणे शहरातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. नोकरीसाठी मोठी रांग या व्हिडिओत दिसत आहे. ही रांगा लावलेले युवक चक्क अभियंते आहेत. आयटी कंपनीत ज्युनिअर डेव्हलपर पदासाठी या मुलाखती घेण्यात आल्या.
पुणे, दि.27 जानेवारी 2024 | पुणे शहर आयटी सिटी म्हणून ओळखले जाते. पुणे शहरात अनेक दिग्गज आयटी कंपन्यांची कार्यालये आहेत. पुणे शहरातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. नोकरीसाठी मोठी रांग या व्हिडिओत दिसत आहे. ही रांग सरकारी नोकरीसाठी नाही तर खासगी नोकरीसाठी आहे. रांग लावलेले युवक पदवीधर नाहीत. ते चक्क आयटी अभियंते आहेत. यामुळे पुणे शहरात 100 जागांसाठी एका आयटी कंपनीत वॉक-इन इंटरव्यू घेण्यात आले. ज्युनिअर डेव्हलपर पदासाठी या मुलाखती घेण्यात आल्या. त्यासाठी 3,000 अभियंते आले होते. हे सर्व जण रांगेत उभे होते. त्यातील अनेक जण फ्रेशर्स होते. 2,900 पेक्षा जास्त बायोडाटा या मुलाखतीत जमा झाले. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. त्यानंतर 100 पदांसाठी झालेली ही गर्दी पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे. पुणे शहरात आयटी कंपन्यांची संख्या मोठी असताना इतके युवक मुलाखतीसाठी आले. यामुळे अनेक आयटी अभियंते रोजगाराच्या शोधत असल्याचे दिसून येत आहे.
View this post on Instagram
अनेक युजर्सकडून कॉमेंट
सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर झाल्यानंतर अनेक युजर्सकडून कॉमेंट व्यक्त करण्यात आल्या आहेत. एका युजर्सने म्हटले आहे की, एक कंपनी एनालॉग पद्धतीने अभियंत्याचे बॉयोडाटा जमा करत आहे, हे खूप खेदाची बाब आहे. एकाने लिहिले, कोणी दिला होता इंजिनिअर होण्याचा सल्ला, त्याला शोधून काढा. एकाने गावाकडे जाऊन शेती करण्याचा सल्ला दिला.
हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. लाखो जणांना व्हिडिओ पाहिला आहे. हजारो जणांनी लाईक केला आहे. अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सध्या नोकरी मिळवणे किती अवघड असल्याचे यामुळे पुन्हा एकदा समोर आले आहे.