AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सांगलीत आठ दिवसाचा संपूर्ण लॉकडाऊन जाहीर; जयंत पाटील म्हणाले, सर्वांचाच जीव महत्त्वाचा

सांगलीत कोरोना संसर्गाचा कहर वाढल्याने सांगलीत आठ दिवसाचा तातडीचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. (jayant patil announced 8 days lockdown in sangli)

सांगलीत आठ दिवसाचा संपूर्ण लॉकडाऊन जाहीर; जयंत पाटील म्हणाले, सर्वांचाच जीव महत्त्वाचा
जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस
| Updated on: May 04, 2021 | 1:06 PM
Share

सांगली: सांगलीत कोरोना संसर्गाचा कहर वाढल्याने सांगलीत आठ दिवसाचा तातडीचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. उद्या 5 मे रोजी मध्यरात्रीपासून हा लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी तशी घोषणाच केली आहे. आपल्या सर्वांचा जीव वाचणं महत्त्वाचा आहे. त्यासाठीच हा लॉकडाऊन करण्यात येत असल्याचं भावनिक आवाहनही त्यांनी केलं. (jayant patil announced 8 days lockdown in sangli)

जयंत पाटील यांनी ट्विट करून या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या १ हजार ५६८ वर पोहोचली असून काल(सोमवारी) ४० रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेवून सांगली जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊन करण्यात येत असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे.

लॉकडाऊन एकमेव पर्याय

सांगलीतील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. प्रशासनाशी चर्चा करून सांगली जिल्ह्यात ५ मे रोजी मध्यरात्रीपासून ८ दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेत असल्याची माहिती त्यांनी दिली.

सांगलीला ऑक्सिजन काठावर

सांगली जिल्ह्याला ऑक्सिजन काठावर मिळतंय, प्रचंड ताकद खर्च करून बाहेरून ऑक्सिजन मिळवावे लागत आहे. औषधांबाबतही प्रश्न निर्माण होत आहेत म्हणून ही शृंखला मोडण्यासाठी कठोर निर्णय घेणे गरजेचे होते. जीवनावश्यक वस्तूंपेक्षा आपल्या सर्वांचे जीवन महत्त्वाचे आहे त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांना हा लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. तुम्हा सगळ्यांच्या मदतीनेच आपल्याला कोरोनावर मात करायची आहे. त्यामुळे घरीच रहा, सुरक्षित रहा, असे आवाहनही त्यांनी केलं आहे.

सांगलीत तळ ठोकून

दरम्यान, जयंत पाटील हे 1 मे पासून सांगलीत तळ ठोकून आहेत. जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती, रुग्णसंख्या, उपलब्ध बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर या सर्व गोष्टींचा आढावा घेत आहेत. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि अन्य भागात कोरोनाची परिस्थिती भयावह आहे. या ठिकाणीही सलग दोन दिवस बैठक घेत कोरोना नियंत्रण आणण्यासाठी अधिकाऱ्यांना निर्देशही त्यांनी दिले. (jayant patil announced 8 days lockdown in sangli)

संबंधित बातम्या:

LIVE | अहमदनगरमध्ये भाजीपाला विक्रीस बंदी, तरीही नागरिकांची भाजी खरेदीसाठी गर्दी

Maharashtra Coronavirus LIVE Update : राहुल गांधींची संपूर्ण लॉकडाऊनची मागणी

…तोपर्यंत महाविकासआघाडी सरकारला धोका नाही; राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा

(jayant patil announced 8 days lockdown in sangli)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.